मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला लागलेली गळती काही थांबायची चिन्हे नाहीत. विधानसभा निवडणुकीत लोकसभेचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता दिसत असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेचा वाट धरली आहे. राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि कोकणातले आक्रमक नेते आमदार भास्कर जाधव हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रिलायक सूत्रांनी दिलीय. जाधव यांच्या चर्चेच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या असून लवकरच हा प्रवेश होईल असं मानलं जातंय. जाधव यांनी प्रवेश घेतला तर तो राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का असणार आहे.
मतदारसंघ शिवसेनेकडे आहे की भाजपकडे याचा विचार करून नेते त्या त्या पक्षात येत आहेत. राष्ट्रवादीचे आणखी तीन आमदार लवकरच हातावरचं घड्याळ सोडून शिवबंधन बांधणार असल्याची शक्यता असून राष्ट्रवादीला पुन्हा मोठं भगदाड पडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे बडे नेते धास्तावले असून गळती रोखायची कशी असा प्रश्न मोठ्या नेत्यांना पडलाय. बहुजन विकास आघाडीचे बोईसरचे आमदार विलास यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला.
बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांच्यासह इतर दोन आमदार हे शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. युतीत बार्शी हा मतदारसंघ शिवसेनेने मागितलाय. तो मतदारसंघ भाजप सेनेला देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या खास भाषणशैलीसाठी प्रसिद्ध असलेले सोपल आता शिवसेनेच्या तिकिटावर लढण्याची शक्यता आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours