सातारा 21 ऑक्टोंबर : राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत असतानाच साताऱ्यात विधानसभेसोबतच सातार लोकसभेची पोटनिवडणुकही होतेय. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे तिथे पोटनिवडणूक होतेय. सकाळीच उदयनराजे यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि सहकुटुंब मतदान केलं. साताऱ्याच्या जनतेनं मला प्रेम दिलं. भरभरून प्रेम दिलं. त्यामुळे त्यांच्या ऋणातून मी कधीही मुक्त होणार नाही. मला जनतेसाठी काम करायचंय. त्यामुळच मला ओव्हर कॉन्फिडन्स नाही, तर कॉन्फिडन्स आहे. यश मिळेलच अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
मतदानाला सुरूवात झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या मुळगावी काटेवाडीत मतदान केलं. मतदान केल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना बारामतीकरांचे आभार मानले. बारामतीकरांनी आमच्यावर कायम विश्वास दाखवला. याही वेळी ते विश्वास दाखवतील असं अजित पवारांनी सांगितलं. लोकशाहीचा हा उत्सव आहे. प्रत्येकानी मतदान करावं. निवडणुकीच्या प्रचारात अनेक गोष्टी होत असतात. मात्र सगळी कटुता आता संपली पाहिजे. आघाडीला उत्तमं यश मिळेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
मतदान करताना या गोष्टींची काळजी घ्या
1. सोमवारी  मतदानासाठी बाहेर पडताना  स्वतःचा मोबाईल घेऊन  जाऊ नका.
2. मतदान बुथमध्ये मोबाईल नेण्यासाठी बंदी आहे. तिथे जाऊन परत येण्यापेक्षा मोबाईल सोबत घेऊ नये. त्यामुळे वेळ वाचेल.
3. मतदानाला जाण्याआधी आयोगाच्या APP वर आपले नाव आणि मतदान केंद्र आधीच जाणून घ्या. त्यामुळे तुमचा खूप वेळ वाचेल.
4. मतदान केंद्राबाहेरही मतदतीसाठी अनेक केंद्र उपलब्ध असतात. त्या ठिकाणाहूनही तुम्हाला माहिती मिळू शकते.
5.मतदान करताना लक्ष द्या की स्लिप येईपर्यंत (7 सेकंद)  बटण दाबून ठेवा. बीप असा आवाज येईल. त्यानंतरच तिथून बाहेर पडा.
6. EVM मशीनवर बटण दाबताना लक्षात ठेवा की VVPAT मधून स्लिप बाहेर येईपर्यंत बटणावरचं बोट काढू नका.
7. VVPAT स्लिपसह आपलं टाकलेलं मत त्याच उमेदवाराला पडलेलं आहे की नाही याची खात्री करा.
8. काही तक्रार असल्यास संबंधीत केंद्र अधिकाऱ्याकडे तुम्ही तुमची तक्रार किंवा सूचना नोंदवू शकता.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours