मुंबई, 28 मार्च : महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये आणखी नवे कोरोनाचे 05 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर नागपुरात एका रुग्णाच्या टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं आता एकूण रुग्णांची संख्या 159 वर पोहोचली आहे. शुक्रवारी दिवसभरात मुंबईतील भाभा आणि कस्तुरबा रुग्णालयात 9 रुग्णांची नोंद झाली. मुंबईत आता कोरोनाग्रस्तांची संख्या 91 झाली आहे. तर आतापर्यंत मुंबईत 05 जणांचाा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत संशयित रुग्णांसह 209 कॉरोनाग्रस्त दाखल आहेत. शुक्रवारी दिवसभरात एकूण 17 नवीन रुग्ण आढळले होते. सांगलीमध्ये नवे 12 रुग्ण तर नागपूरमध्ये 5 रुग्ण आढळले असून राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्याही तब्बल 159 वर पोहोचली आहे. नवी मुंबईत दीड वर्षाच्या बाळाला कोरोनाची लगण झाली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours