मुंबई, 29 मार्च : कोरोना व्हायरसचं देशभरात वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार असल्याच्या सूचना दिल्या आहेत. या लॉकडाऊनंतर जनतेला सामोरं जावं लागणाऱ्या समस्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बातमध्ये जनतेची माफी मागितली आहे. कोरोनाविरोधातील लढाई जिंकायची आहे त्यामुळेच काही कठोर निर्णय घावे लागले. त्याबद्दल मी जनतेची माफी मागतो. लॉकडाऊन करणं गरजेचं होतं अन्य़था कोरोना संसर्ग वेगानं पसरला असता असं ते म्हणाले.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी
आज आम्हाला त्यांच्यापासून प्रेरणा घ्यायची आहे. गेल्या काही दिवसांत मी अशा काही लोकांशी दूरध्वनीवरून बोललो आहे, त्यांचा उत्साह वाढवला आहे आणि त्यांच्याशी बोलण्यानं माझाही उत्साह वाढला आहे. मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours