मुंबई, 24 मार्च : महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. खबरदारी म्हणून लोकं मास्क, सॅनिटायझरचा वापर करत आहे. राज्यावर आलेल्या या संकटातही काही लोकं फायदा उचलण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी अशा या टोळीचा पदार्फाश केला आहे. मुंबईत तब्बल 14 कोटी रुपये किंमतीचे मास्क जप्त केले आहे. देशातली ही सर्वात मोठी कारवाई आहे.
मुंबई क्राइम ब्रांचने मास्कचा मोठा साठा जप्त केला आहे.  या आरोपींनी मोठ्या प्रमाणात मास्कचा साठा करून ठेवला होता. तब्बल 25 लाख मास्क जप्त करण्यात आले आहे. याची किंमतही 14 कोटी इतकी आहे. हे मास्क काळ्याबाजारात विकण्याचा आरोपींचा हेतू होता.
2 रुपयांना येणारा हा मास्क 10 रुपयांमध्ये आणि 100 रुपयांचा मास्क हा 400 रुपयांमध्ये विकण्याचा या भामट्यांचा डाव होता.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, आणि पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाबद्दल खुलासा करणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours