पुणे, 1 एप्रिल: 'कोरोना व्हायरस' आणि दिल्लीतील 'निझामुद्दीन' कनेक्शनमुळे आता पुणे प्रशासन हादरलं आहे. दिल्लीतील निझामुद्दीन येथे आयोजित तब्लिगी जमात परिषदेत सहभागी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून 136 प्रवासी गेले होते. निझामुद्दिन रिटर्नपैकी 36 जण हे पुणे जिल्ह्यातले असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या 40 पथकांकडून त्यांचा शोध घेण्यात आला आहे. परिणामी निझामुद्दीनच्या कार्यक्रमातून देशभर कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. निझामुद्दीन येथून परतलेल्या 136 पैकी 36 जण पुण्यातील आहेत. 36 पैकी 30 जण पुणे शहराच्या विविध भागात राहतात तर 3 जण पिंपरी आणि 3 जण हे पुणे ग्रामीण भागात राहतात. दरम्यान, महाराष्ट्रातील 136 पैकी 116 कोरोना संशयितांशी संपर्क साधण्यात प्रशासनाला यश आल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली आहे.

18 मार्चनंतर हे वेगवेगळ्या तारखेला 136 प्रवासी पुण्यात परतले होते. त्यापैकी अनेक जणांनी फोन बंद करून ठेवले आहेत. सर्व निझामुद्दीनहून परत आलेल्या प्रवाशांची कोरोना लक्षणे तपासली जाणार आहे. पुण्यातील 36 पैकी 5 जणांनी आधीच क्वारंटाइन करण्यात आले आहे.

दरम्यान, देशभरात सध्या दिल्लीच्या निझामुद्दीन येथील तब्लिगी जमात परिषदेमुळे (Nizamuddin Meet) भीतीचं वातावरण आहे. 13 ते 15 मार्च दरम्यान फक्त देशातील विविध राज्यांमधूनच नव्हे तर परदेशातूनही लोकं हजर होते. त्यांनी निझामुद्दीनमधील तब्लिगी मारकझला भेट दिली. दरम्यान, येथे जमलेल्या बर्‍याच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं आहे.

या परिषदेत सहभागी झालेल्या 9 जणांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये तेलंगणातील 6 तर कर्नाटक, तामिळनाडू, जम्मु काश्मीर आणि मुंबईतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तामिळनाडूत 50 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. त्यापैकी 45 जणांचा निझामुद्दीनशी संबंध असल्याचं दिसून आलं आहे. तर 441 जणांमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसून आलीत, अशी माहिती दिल्ली सरकारने दिली आहे. यानंतर तब्बल 2,100 पेक्षा अधिक रुग्णांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

1,746 जण या परिषदेत सहभागी झाले होते. त्यापैकी 216 परदेशी आणि 1,530 भारतीय नागरिक तिथं राहत होते. जवळपास 824 विदेशी नागरिकांनी देशातील विविध भागातील कार्यक्रमात सहभाग घेतला होतो. सर्व राज्यांच्या पोलिसांना 21 मार्चला या 824 विदेशी नागरिकांची माहिती पाठवण्यात आली आहे. शिवाय भारतीय तब्लीक जमातीच्या कर्मचाऱ्यांची नावं मिळवण्याच्या सूचना देण्यात 28 मार्चला आल्यात, जेणेकरून या सर्वांची वैद्यकीय चाचणी होईल आणि त्यांना क्वारंटाइन केलं जाईल, अशी माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours