नवी दिल्ली, 17 एप्रिल : कोरोनाव्हायरसचा प्रसार वेगाने होत आहे. असे असले तरी, सध्या भारतात मृत्यू दर कमी झाला आहे. मात्र अद्याप कोरोनावर औषध सापडले नाही आहे. सध्या कोरोनाव्हायरसच्या लक्षणांच्या आधारे रुग्णावर उपचार केले जात आहे. जगभरातील शास्त्रज्ञ आणि वैद्यकीय व्यावसायिक त्याच्या उपचारासाठी औषधे तयार करण्यासाठी आणि लस विकसित करण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. अशातच भारताच्या तब्बल 6 कंपन्यांनी कोरोनावर औषध शोधले आहे.

यासाठी सुमारे 70 प्रकारच्या लसींची चाचणी घेण्यात येत आहे आणि किमान तीन लसी मानवी चाचणीच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. मात्र या लस तयार करण्यासाठी जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांच्या मते ही लस 2021 पूर्वी तयार होण्याची शक्यता नाही.

ट्रान्सनेशनल हेल्थ सायन्स अँण्ड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, फरीदाबादचे कार्यकारी संचालक गगनदीप कांग यांनी, झेडस कॅडिला दोन लसांवर काम करत असताना, सीरम इन्स्टिट्यूट, बायोलॉजिकल इ, भारत बायोटेक, इंडियन इम्युनोलॉजिकल आणि मिनवॉक्स प्रत्येक लसीवर काम करत आहेत. कांग 'एपिडेमिक प्रिपेडिरेनेस इनोव्हेशन' (सीपीआय) चे उपाध्यक्ष देखील आहेत, ज्यांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासात नमूद केले आहे की, "कोव्हिड-19 देशातून बाहेर जाण्यासाठी जागतिक पातळीवरील लस अनुसंधान व विकास प्रयत्नांचा वेग आणि प्रमाण वेगळा आहे". तज्ञ म्हणतात की ही एक जटिल प्रक्रिया आहे ज्यात चाचणीचे अनेक टप्पे आणि अनेक आव्हाने असतात.

लस तयार होण्यासाठी लागणार 1 वर्षाचा कालावधी
नवीन कोरोनाव्हायरस, SARC कोव्हिड-19 लस तयार होण्यास 10 वर्षे लागणार नाहीत पण इतर लस तयार करण्यासाठी लागणाऱ्या कालावधीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो, अशी शक्यता भारतीय शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. केरळमधील राजीव गांधी बायोटेक्नॉलॉजी सेंटर (आरजीसीबी) चे मुख्य वैज्ञानिक अधिकारी ई श्रीकुमार यांनी, "लस विकसित करणे ही मोठी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये बर्‍याच वर्षे लागतात आणि बर्‍याच आव्हानांना तोंड द्यावे लागते", असे सांगितले. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (CSIR) हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर अणि आण्विक जीवशास्त्र केंद्राचे संचालक राकेश मिश्रा म्हणाले, साधारणत: लस विकसित होण्यास अनेक महिन्यांचा अवधी लागतो कारण त्याला वेगवेगळ्या टप्प्यात जावे लागते व त्यानंतर ते मंजूर व्हावे लागतात". दरम्यान, कोणत्याही देशाने अद्याप लस तयार केल्याचा दावा केलेला नाही. त्यामुळे भारतात सध्या प्लाझ्मा थेरपीचा वापर करून रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours