नवी दिल्ली, 07 एप्रिल : देशात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. गेल्या 24 तासात भारतात तब्ल 354 नव्या घटना समोर आल्या आहेत. तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं भारतातील रुग्णांची संध्या 4421 झाली आहे. यातील आतापर्यंत 326 लोकं निरोगी होऊ घरी परतले आहेत. तर एकूण 114 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. राज्यांबाबत बोलायचे झाल्यास महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण आहे. त्यानंतर तमिळनाडूचा क्रमांक लागतो.
भारतातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी, मृत्यूदर कमी होताना दिसत आहे. 4421 कोरोनारुग्णांपैकी 326 निरोगी झाले आहेत. त्यामुळं इतर देशांच्या तुलनेत भारतात मृतांची आकडेवारी कमी आहे. भारतात कोरोना अजूनही दुसऱ्या टप्प्यात आहे. क्लस्टर आउटब्रेकच्या काही घटना भारतात घडल्या असल्या तरी त्यांचे प्रमाण कमी आहे.
राज्यनिहाय आकडेवारी
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत आणखी 21 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी दोन आणि पंजाब, गुजरात आणि उत्तर प्रदेशमधील एक अशा रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक 45 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर गुजरातमध्ये 12, मध्य प्रदेशात 9, तेलंगणा आणि दिल्लीमध्ये प्रत्येकी 7, पंजाबमध्ये 6 आणि तामिळनाडूमध्ये 5 मृत्यू झाले. आकडेवारीनुसार, कर्नाटकात 4 मृत्यू तर पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशात प्रत्येकी 3 जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश आणि केरळमध्ये 2 मृत्यू झाले आहेत. बिहार, हिमाचल प्रदेश आणि हरियाणामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत 24 तासांत 7 मृत्यू; राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 868
राज्यात आज कोरोनाच्या 120 नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण कोरोनारुग्णांची संख्या त्यामुळे 868  झाली आहे. आतापर्यत  70 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आज दिवसभरात राज्यात 7 जणांचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला. हे सगळे रुग्ण मुंबई आणि परिसरात दाखल होते. यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनाबळींची संख्या 52 झाली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours