पुणे, 07 एप्रिल : कोरोना व्हायरचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊनमुळे सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. पण कोरोना साथीच्या नँशनल लॉकडाऊनमुळे यावर्षीची 14 एप्रिलची आंबेडकर जयंती ही आपआपल्या घरातच साजरा करा, असं आवाहन बाबासाहेबांचे वारसदार आणि वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यामुळे गुढीपाडवा, रामनवमीप्रमाणे आता आंबेडकर जयंतीदेखील रद्द करण्यात आली आहे.
नँशनल लॉकडाऊन 14 एप्रिलच्या आधी संपत असल्याने काही आंबेडकरी अनुयायांनी आंबेडकर जयंती सार्वजनिकरित्या साजरी करण्याचं योजिलं होतं. पण महाराष्ट्रातला व्हायरसचा वाढता प्रसार पाहता आंबेडकरी अनुयायांनी जयंतीच्या नावाखाली अजिबात घराबाहेर पडू नये, असंही आंबेडकर म्हणालेत.
तसंच जयंतीच्या नावाने गोळा केलेली वर्गणी कार्यकर्त्यांनी कोरोना बाधित गरजूंना वाटप करावी, असंही आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. दरम्यान, भारतात Coronavirus ची साथ अद्याप दुसऱ्या टप्प्यात आहे. याचा अर्थ ही साथ कम्युनिटी स्प्रेडच्या स्वरूपात पसरलेली नाही. पण AIIMS च्या संचालकांनी मुंबईसाठी धोक्याचा इशारा दिला आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाची साथ काही भागांमध्ये तिसऱ्या टप्प्यात पोहोचली असल्याचं सांगितलं. आता ज्या भागात हा टप्पा गाठला आहे, तिथेच ती आटोक्यात ठेवली नाही, तर संपूर्ण शहरभर हा व्हायरस झपाट्याने पसरेल आणि मग आता न्यूयॉर्क किंवा सुरुवातीला वुहानची झाली, तशी अवस्था येईल. धक्कादायक म्हणजे गुलेरिया यांनी या थोडक्या भागांमध्ये मुंबईचं नाव घेतलं.
Post A Comment:
0 comments so far,add yours