पुणे, 19 एप्रिल : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जास्तीत जास्त लोकांच्या चाचण्या करणं गरजेचं असतं. कारण अनेक कोरोनाबाधित रुग्णांना या रोगाची लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे असे रुग्ण समोर न आल्यास त्यांच्यामुळे इतरांना बाधा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने कोरोनाच्या चाचण्या वाढवल्या असून आता कोरोना टेस्टिंगमध्ये महाराष्ट्र राज्यच सर्वात आघाडीवर आहे. आयसीएमआरने जाहीर केलेल्या आकडेवारतून हा खुलासा झाला आहे.
राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या सर्वाधिक दिसत आहे. महाराष्ट्राने टेस्टिंगमध्ये साठ हजारांचा टप्पा गाठला आहे. त्या तुलनेत इतर राज्ये कुठेच नाहीत. चाचण्या घेण्यात आपल्यापाठोपाठ राजस्थान, गुजरात तामिळनाडू आणि पाचवा क्रमांक उत्तर प्रदेशचा लागतो. रँपिड टेस्टिंगचं घोषणा करणारं केजरीवालांचं दिल्ली तर थेट सातव्या क्रमांकावर आहे. तर सहावा क्रमांक केरळचा लागतो.
कोरोना टेस्टिंग आकडेवारी (18 एप्रिलपर्यंत)
महाराष्ट्र - 59151
राजस्थान -42718
गुजरात -30783
तामिळनाडू - 29178
उत्तर प्रदेश - 26829
केरळ - 22, 000
दिल्ली - 20, 000
दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. जवळपास महिनाभरापासून देशभरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनसोबतच जास्तीत जास्त चाचण्या करण्याची गरज असल्याचं यातील तज्ञांचं म्हणणं आहे. मात्र भारतात सध्या लोकसंख्येच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात चाचण्या होत नसल्याची टीका होत आहे.
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ
आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या -15 हजार 707
आतापर्यंत बरे झाले - 2 हजार 231
आतापर्यंत मृत्यू - 507
गेल्या 24 तासात 1329 नवीन प्रकरणे तर 24 तासांत 27 मृत्यू
24 तासांत 239 लोक बरे, बरे होण्याची टक्केवारी 14.20 टक्के
संपादन - अक्षय शितोळे
Post A Comment:
0 comments so far,add yours