भंडारा, कोरोना या विषाणु मुळे जिल्हा बंदी असल्यामुळे कामे उद्योगधंदे बंद पडले आहेत अशावेळी हाता वर पोट भरणार-या वर्गासाठी विविध स्तरावर मदत केली जात आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ, भंडारा अंतर्गत असलेल्या नवप्रभा लोकसंचालित साधन केंद्र, भंडारा यांच्या जिल्हा परीषद, भंडारा परिसरातील "शिवभोजन" केंद्र येथे गिरोला (कारधा) येथील रेशनकार्ड नसलेल्या गरिब व गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी माविमचे भंडाराचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे सर, नवप्रभा लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक रंजना खोब्रागडे मॅडम, क्षेत्रीय समन्वयक रेखा उमाळे मॅडम, मनोज केवट सर, लेखापाल रोशन साकुरे सर,, सामाजिक कार्यकर्ते माधुरी देशकर, यशवंत भोयर, संदीप मारबते, यांच्यासह अनेक उपस्थीत होते
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post A Comment:
0 comments so far,add yours