मुंब्रा, 23 एप्रिल : मुंब्र्यातील दोन मजली इमारतीमध्ये पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे लोळ उठले होते. काही क्षणात ही आग भडकली आणि रौद्र रुप धारण केलं. 5 टेक्साटाइल डायनिंग युनिटमध्ये ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. आग लागल्यानंतर स्थानिकांनी गोंधळ सुरू केला. आत कोणी अडकलं का याचा अंदाज घेत होते. त्यांनी तातडीनं अग्निशमन दलाला फोन करून आगीची माहिती दिली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

पहाटे 3 च्या सुमारास लागलेल्या टेक्साटाइल डायनिंग युनिटमधील आगीच कारण अद्याप समजू शकलं नाही. या आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून कुलिंग करण्याचं काम सुरू आहे. दरम्यान ही आग कशामुळे लागली असावी याची चौकशी करण्यात येणार आहे. या आगीमुळे युनिटमधील लाखों रुपयांचं सामान जळून खाक झालं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours