पुणे, 25 एप्रिल : पुण्यात रुग्णाची सेवा करताना कोरोना संक्रमित झालेल्या महिला डॉक्टरचा मृत्यू अशी बातमी आणि त्यांना श्रद्धांजली वाहणारा मेसेज तुम्हालाही सोशल मीडियावर आला असेल, तर पुढे पाठवू नका. आधी हे वाचा

COVID-19 शी सामना करताना पुण्याच्या डॉक्टरचा मृत्यू. रुग्णसेवा करताना कोरोनाची लागण झआली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला, असा मेसेज Whatsapp आणि इतर समाजमाध्यमांवर शुक्रवारी फिरत होता. या मेसेजची सत्यता News18lokmat ने पडताळून पाहिली आणि ही बातमी खोटी असल्याचं समोर आलं.

पुण्यात राहणाऱ्या डॉ.मेघा श्रीकांत व्यास यांना रुग्णसेवा करताना कोरोनाची लागण झाली आणि त्यांचा मृत्यू झाल्याची ही बातमी Fake News आहे. डॉ. मेघा यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला आहे. डॉ. मेघा यांचे पती श्रीकांत हेसुद्धा डॉक्टर आहेत. त्यांना लहान मुलगाही आहे. दोन दिवसांपूर्वी डॉ. मेघा यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथेच त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयाकडून मिळालेल्या रिपोर्टमध्ये त्यांची Covid-19 ची चाचणी निगेटिव्ह असल्याचं म्हटलं आहे.

Facebook आणि Whatsapp वर यासंदर्भात कोरोना मृत्यू अशी बातमी फिरत असल्यामुळे कुटुंबीयांना मोठा मनस्ताप झाला. अशा प्रकारे खात्री नसताना कुठल्याही बातम्या फॉरवर्ड करू नका. यामुळे अकारण तुमची इच्छा नसतानाही इतरांना मनस्ताप होतो.
Coronavirus च्या साथीत याआधीही अनेक बातम्या, मेसेज व्हायरल झाले आणि नंतर ते फेक असल्याचं लक्षात आलं आहे. त्यामुळे अधिकृत स्रोतांकडून आलेल्या बातम्याच ग्राह्य धराव्यात, असं आवाहन करण्यात येत आहे. सोशल मीडियामधून फिरणाऱ्या संदेशांमधले अनेक संदेश खोटे असतात, अर्धवट माहितीवर आधारित असतात. त्यामुळे ते फॉरवर्ड करताना काळजी घ्यावी, फेक न्यूज पसरवण्यात आपला वाटा असू नये म्हणून कुठलाही संदेश खात्री असल्याशिवाय पुढे पाठवू नये.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours