मुंबई 07 मे: मुंबईतील वाईन शॉप बंद करुन देखील गेल्या 24 तासात राज्यात तब्बल 43 कोटी 75 लाख रुपयांची दारू आज तळीरामांनी खरेदी केलीय तर मंगळवारी 24 तासात तळीरामांनी 62 कोटी 55 लाख रुपयांचे मद्य विकत घेतले होते. तर राज्यांत 31 जिल्हयात मद्य विक्री सुरु करण्यात आली आहे. 9 जिल्हयात मद्य विक्रीस मनाई तर 4 जिल्हयात सुरु केलेली मद्य विक्री पुन्हा बंद केली आहे.
राज्यात मद्य विक्रीस परवानगी देण्यात आली असून गेल्या २४ तासात राज्यात फक्त २५ टक्के मद्य विक्री झाली. या २५ टक्के मद्यविक्रीतूनन गेल्या २४ तासात तब्बल ४३ कोटी ७५ लाख रुपयांचे मद्य तळीरामांनी आजही विकत घेतली मंगळवारी २४ तासात तळीरामांनी ६२ कोटी ५५ लाख रुपयांचे मद्य विकत घेतले होते त्यामुळे दोन दिवसांमध्ये म्हणजे गेल्या ४८ तासात तळीरामांनी चक्क १०६ कोटी ३० लाख रुपयांचे मद्य विकत घेतल्याचं स्पष्ट झालं आहे.
तर मुंबई महानगर पालिकेच्या आदेशानंतर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर येथील मद्य विक्री बंद करण्यात आली यामुळे राज्यांत ३१ जिल्हयात मद्य विक्री सुरु करण्यात आली आहे. ९ जिल्हयात मद्य विक्रीस मनाई तर ४ जिल्हयात सुरु केलेली मद्य विक्री बंद केली गेली आहे.
अवैध मद्य विक्रीतून जवळपास १३ कोटी रुपयांचा मुद्देमाल उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. राज्यात एकूण १० हजार ८२२ परवाना धारक मद्य विक्री दुकाने असून यापैकी फक्त २ हजार ९६७ परवाना धारक दुकानांमधून मद्य विक्री केली गेली आहे. गर्दी टाळण्यासाठी तर आज पासून सर्व वाईन शॉप्सवर टोकन पद्धत सुरु करण्याचे आदेश देण्यात आले होते. गर्दी दिसली तर थेट दुकान मालकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.
Post A Comment:
0 comments so far,add yours