भंडारा, दि. १८ ऑक्टोंबर:- जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहाचे समारोपीय समारंभ व बक्षीस वितरण कार्यक्रम नुकताच जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रिजवान फारूकी होते. प्रमुख अतिथी म्हणून वर्ग- १ अस्थिव्यंग विभाग प्रमुख तथा कार्यक्रम अधिकारी डॉ. पियुष जक्कल मानसोपचार तज्ञ डॉ. रत्नाकर बांडेबुचे मानसोपचार तज्ञ डॉ. सुहास गजभिये उपस्थित होते.
जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह निमित्य ९ ते १६ ऑक्टोंबर २०२१ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात भंडारा शहरात रॅली काढून त्या माध्यमातून मानसिक आरोग्य विषयक जनजागृती करण्यात आली, भंडारा बसस्थानक येथे मानसिक आरोग्य जनजागृती कार्यक्रम , प्राथमिक आरोग्य केंद्र करडी व उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय साकोली येथे तणाव मुक्त मानसिक शिबिर घेण्यात आले, सामान्य रुग्णालय भंडारा येथे परिचर्या विद्यालयातील प्रशिक्षणार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. या विविध स्पर्धांमधून ज्यांनी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला त्या प्रशिक्षणार्थी परिचारिकांना पाहुण्यांच्या हस्ते स्मृतीचिंह व प्रमाणपत्र देण्यात आले.
या समारोपीय समारंभानिमित्त डॉ. रत्नाकर बांडेबुचे यांनी मानसिक आरोग्य सप्ताह निमित्य सर्व कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. तसेच कार्यक्रमाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सहभाग नोंदविला त्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रिजवान फारूकी यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात सर्व उपस्थितांना सांगितले की, आपण जेव्हा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काम करीत असतो. तेव्हा जे मानसिक आजारी रुग्ण आपल्याला भेटतील त्या रुग्णांना आपण सर्वतोपरी समुपदेशन करा व त्यांना पुढील तपासणी, उपचारासाठी योग्य असे मार्गदर्शन करणे हेच या जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे महत्त्वाचे कार्य ठरेल, सर्वांनी त्याची अंमलबजावणी करून रुग्णांना समुपदेशन करावे.
कार्यक्रमाचे संचालन सामाजिक कार्यकर्त्या मंथनवार यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मानसशास्त्रज्ञ डॉ. सतीश भगत, ऑक्युपेशनल थेरपिस्ट डॉ. अमन भांडारकर, रसना ठवकर, सामाजिक कार्यकर्ता सुधीर दहिवले, दीपक थाटे, विशेष शिक्षक सुधीर भोपे यांनी सहकार्य केले.
Post A Comment:
0 comments so far,add yours