प्रथम सत्रात मराठी पत्रकार दिन उद्घाटन सोहळा भंडारा विधानसभा क्षेत्राचे आ.नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते द्विपप्रज्वलन व आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थितीत भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम, सचिव मिलींद हळवे, कोषाध्यक्ष डी.एफ.कोचे, उपाध्यक्ष राकेश चेटुले, वरिष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर मुंडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना चेतन भैरम यांनी ‘पत्रकार दिन’ दिनाचे महत्व सांगून आजच्या काळातील बदलती पत्रकारीता यावर प्रकाश टाकला. तद्पश्चात उद्घाटनीय मार्गदर्शन करतांना आ.नरेंद्र भोंडेकर यांनी विकासात्मक पत्रकारिता व लोकशाहीतील चौथा स्तंभ या विषयावर सखोल असे उपस्थितांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी आ.भोंडेकर यांनी मोहाडी तालुका पत्रकार संघ यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार जाहीर झाला. त्या निमित्त मोहाडी तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच पत्रकारी क्षेत्रात संपूर्ण आयुष्य वेचून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल लाखांदूरचे नरेंद्र रामटेके, तुमसरचे रोहित बोंबार्डे, दिघोरी मोठीचे सुधीर करंजेकर, पवनीचे अशोक पारधी, मोहाडीचे राजू बांते, भंडारातील इंद्रपाल कटकवार, देवानंद नंदेश्वर, राजू आगलावे, कु.आचल भुरे, कु.रेश्मा लिमजे, तुमसरचे सिताराम जोशी यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
दुसर्या सत्रात तुमसर विधानसभा क्षेत्राचे माजी आ.चरण वाघमारे यांच्या उपस्थितीत आधुनिक पत्रकारिता या विषयावर विचारमंथन करण्यात आले. यात वरिष्ठ पत्रकार शशी वर्मा यांनी मार्गदर्शन करतांना पत्रकारांच्या आधुनिक काळातील समस्या यावर प्रकाश टाकून उदाहरणासहित मार्गदर्शन केले. तर ज्येष्ठ पत्रकार हिवराज उके यांनी आधुनिक काळात पत्रकारितेचे बदलते स्वरुप यावर मत व्यक्त करतांना पत्रकारांसाठी असलेल्या विविध योजना तसेच आज पत्रकारितेला व्यवसायिक स्वरुप प्राप्त होत असल्याचे सांगितले. त्यानंतर मुख्य मार्गदर्शक माजी आ.वाघमारे यांनी मनोगत व्यक्त करतांना बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा उहापोह करुन त्याकाळातील व आजची पत्रकारिता या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. त्यानंतर शासकीय छायाचित्र पत्रकार सुरेश फुलसुंगे, प्रमोद नागदेवे, युवराज गोमासे, मोहाडीचे यशवंत थोटे, चंद्रशेखर साठवणे, प्रमोद गभने, किशोर गडकरी, कामगार नेते वामन चांदेवार, तुमसरचे चैनलाल परिहार, नितीन लिल्हारे, सुधीर गोमासे, विश्वकांत भुजाडे, पवनीचे ब्रम्हदास बागडे, बारव्ह्याचे विलास मेश्राम, साकोलीचे डी.जी.रंगारी यांनी पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्यकेल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन माजी आ.वाघमारे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
तृतीय सत्रात समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी शैलेजा वाघ दांदडे, भंडारा नगरपरिषदचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मुख्यवक्ते ज्ञानेश्वर मुंडे यांनी विकासात्मक पत्रकारितेचे बदलते स्वरुप यावर सखोल मार्गदर्शन करुन पत्रकारांची बदलती भूमिका याविषयावर मत व्यक्त केले. तर शैलेजा वाघ दांदडे यांनी मार्गदर्शन करतांना दिवसभर झालेल्या चर्चासत्रात पत्रकारांच्या विविध समस्याचे निराकरण शासकीय नियमाप्रमाणे कसे करता येईल, यावर मार्गदर्शन करुन येणार्या काळात पत्रकारांसाठी असलेल्या विविध शासकीय योजना जसे घरकूल, विमा, त्यांना मिळणारे सुविधा या विषयी व्यक्तिश: पुढाकार घेऊन नियमाप्रमाणे जिल्ह्यातील पत्रकारांना कशी मदत करता येईल, यावर चर्चा करुन त्यांना मदत करण्याचे आश्वस्त केले. त्यानंतर मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी मार्गदर्शन करतांना जिल्ह्यातील पत्रकारांच्या सकारात्मक लिखाणाचे कौतुक करुन येणार्या फेब्रुवारी महिन्यात नगरपरिषदच्या पुढाकाराने पत्रकारांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त करतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद येथील सेवानिवृत्त कुलगुरु तसेच पत्रकारिता विभागातील विभाग प्रमुख विषयतज्ञ डॉ.धानोरकर यांचे मार्गदर्शन जिल्ह्यातील पत्रकारांना मिळावे याकरीता प्रयत्न करणार, असे सांगितले. ज्येष्ठ पत्रकार डी.एफ.कोचे यांनी मनोगत व्यक्त करतांना बाळशास्त्री जांभेकर यांच्या काळात इंग्रजी सत्ताधार्यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्यात यासाठी दर्पण या मराठी वृत्तपत्र काढण्यात आले आणि तो दिवस ६ जानेवारी हा होता आणि हाच दिवस बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस. त्या दिवसाची आठवण म्हणून ६ जानेवारी महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या विषयी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर पत्रकारिता क्षेत्रात कार्य करीत असतांनाच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे प्रा.डॉ.बबन्ा मेश्राम यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सिहोर्याचे सुरेंद्र पारधी, लोहाराचे दिपक घोडीचोर, पांढराबोडीचे एस.एस.कान्हेकर, सेंदुरवाफ्याचे ताराचंद कापगते, दिघोरी मोठीचे मनोज बोरकर, तुमसरचे लिलाधर वाडीभस्मे, लाखनीचे अनिल शेंडे, साकोलीचे नाजीम पाशाभाई, वरठीचे तथागत मेश्राम, सुधीर गोमासे, समीर नवाज, भंडारा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष किशोर मोरे, सचिव अरविंद शेंडे, सह जिल्ह्यातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कामगार नेते यांचा सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सुरेख संचालन डॉ.प्रा.बबन मेश्राम यांनी तर आभारप्रदर्शन मिलींद हळवे यांनी केले. यावेळी प्रमोद भांडारकर, बाळकृष्ण बावनकर, प्रतिक तांबोळी, सुरेश कोटगले, संदीप नंदनवार, प्रमोद नागदेवे, नितीन धकाते, राजू आगलावे, संजीव जयस्वाल, अजय मानापुरे, समीर नवाब, विलास केजरकर, नाजीम पाशाभाई, अजय मेश्राम, ललितसिंह बाच्छिल, विलास सुदामे, देवानंद नंदेश्वर, प्रमोद गभने, नितीन कारेमोरे़, संजय मते, वामन चांदेवार, रोशन नकोरिया,रवी तिडके, विश्वकांत भुजाडे, सुरेंद्र पारधी, नितीन लिल्हारे, मनोज बोरकर, ब्रम्हदास बागडे, डी.जे.रंगारी, लिलाधर वाडीभस्मे, जैनलाल परिहार, ए.एस.कान्हेकर, किशोर गडकरी, सचिन मेश्राम, ताराचंद कापगते, अजय कुमार, संघर्ष शेंडे, दिलीप बडोले, राजू बांते, मनोहर मेश्राम, सिताराम जोशी, भोजराम तिजारे, यशवंत थोटे, तथागत मेश्राम, दिपक घोडीचोर, सुधीर करंजेकर, युवराज गोमासे, सुधीर गोमासे, भूपेन्द्र पवनकर, चंद्रशेखर साठवणे, सुरेश फुलसुंगे, अनिल शेंडे, मुकेश मेश्राम, निश्चल येनोरकर, मनोहर लोथे, संजय भोयर, विरेंद्र गजभिये, नेपालचंद खंडाईत, मनोज माटे, पृथ्वीराज बन्सोड हे उपस्थित होते.
Post A Comment:
0 comments so far,add yours