माटोरा झिरी येथे वटवृक्षाचा ५ वा वाढदिवस साजरा 



भंडारा :- आजच्या युगात वावरत असतांना ग्लोबल वार्मिंग सारखे प्रश्न निर्माण होऊ नये. तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जिल्हयातील शासकिय, खाजगी व स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून हजारो वृक्षारोपण करण्यात येते. परंतु त्याचा योग्य पाठपुरावा केला जात नाही. ते करण्यासाठी म्हणुन जिल्हयातील प्रत्येक नागरिकांनी वृक्षाच्या वाढदिवसाबरोबर वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जोपासावी असे प्रतिपादन भंडारा उपवनसंरक्षक राहुल गवई यांनी केले. 



      ते भारतीय स्वातंत्र्याच्या शुभ पर्वावर भंडारा  तालुक्यातील व कोका अभरण्यात येणाऱ्या माटोरा झिरी परिसरात वन विभागाच्या पाच कर्मचा-यांनी स्वातंत्र दिनानिमित्त सन २०१८ ला माटोरा झिरी परिसरात एक वडाचा व दोन पिंपळांचे वृक्षारोपण करण्यात आले होते. या वटवृक्ष लागवडीला ५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्या झाडांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. 



          सविस्तर वृत्त असे की, भंडारा  तालुक्यातील व कोका अभरण्यात येणाऱ्या माटोरा झीरी परिसरात वन विभागाचे कर्मचारी अनिल शेळके, निलेश श्रीरामे, ग्यानीराम पातोडे, नरेंद्र कोडवते, नामदेव ताईतकर यांनी स्वातंत्र दिनानिमित्त दिनांक १५ ऑगस्ट २०१८ ला लावलेल्या वडाच्या रोपट्याचे संगोपन व संवर्धन योग्यरित्या केल्याने इवलुशा वडाच्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. सदर वटवृक्ष लागवडीला ५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भंडारा उपवनसंरक्षक राहुल गवई, भंडारा वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेंढे, ग्रामिण युवा प्रागतिक मंडळाचे सचिव अविल बोरकर, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, सौ. सपना गवई, सुनिल साखरवाडे, रिधम गवई, अमित कासेवाले, कु. स्वरा गवई, डा. सचिन निंबार्ते, नविन इनकाने, तुकाराम  डावखोरे इत्यादी मान्यवरांच्या यांच्या उपस्थितीत केक कापून वटवृक्षाचा ५ वा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला आहे. 

      कार्यक्रम प्रसंगी पर्यावरण मित्र सुनिल साखरवाडे, अंकुर सुखदेवे,  धम्मा रामटेके, बालु धारगावे, सचिन कुकडे, पराग भुते, राहुल कोडवते, राजु वानखेडे, संतोष ठवकर, कमलेश भोयर, अशित वासनिक, हर्षल डहारे, जानियल मोगरे, बुराडे, गरूदास पंचबुध्दे, जमजारे व भंडारा वनविभागातील कर्मचारी तसेच माटोरा, सुरेवाडा, बेरोडी, सालेहेटी, सितेपार, खमारी, मंडणगाव या गावातील नागरिकांनी सहकार्य केले आहे.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours