भंडारा:- सीआयटीयू नागपुरच्या वतीने साई मंगल कार्यालय येथे महिला मेळाव्यात भंडारा व तुमसर अंगणवाडी कर्मचारी संघटनेची कार्यकारणी नुकतीच घोषीत करण्यात आली आहे.          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य अध्यक्ष कॉम्रेड शुभा शमीम होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य महासचिव कॉम्रेड चंदा मेंढे यांच्या उपस्थितीत भंडारा व तुमसर अंगणवाडी कर्मचारी संघटनेची कार्यकारणी घोषीत करण्यात आली.

       त्यात अध्यक्षपदी फिरोज पठाण, उपाध्यक्ष कमल सेलोकर, छाया गजभिये, पद्ममा डोंगरे, सचिव मनिषा गजभिये, सहसचिव चंदा मडामे, कविता फेंडर, ज्योती ढेंगे, यामिनी अहिरकर, कुंदा पुडके, ज्योती रेहपाडे, कोषाध्यक्ष नलिनी आकरे, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.  

        त्याबद्दल छाया बुरडे, छाया गजभिये, सविता मस्के, सुनीता मानवटकर, पंचशिला वाघमारे, निर्मला पवार, अल्का हरडे, पंचशिला बोरकर, सिमा ठवकर, कल्पना वरकडे, मिना आरिकर, रंजना वाघमारे, हिरकन्या वंजारी, शांता कावळे, निता बांडेबुचे, राजश्री बांडेबुचे, हर्षकला गणविर, कमल राघोर्ते, शारदा केवट, प्रमिला मडावी, प्रियंका सुखदेवे, आरती लोणारे, कल्पना गणविर, जैतुरा वंजारी, रत्ना बारई, दिपाली मेश्राम, दुर्गा मुंडले, सरिता माटे, अल्का दहिवले, कमल आदमने, शिला पडोळे इत्यादी अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच भंडारा व तुमसर अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी अभिनंदन केले आहे.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours