भंडारा/गोंदिया :- भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील अवैध रेतीचे उत्खनन थांबविण्यासाठी भंडारा, गोंदिया दोन्ही जिल्ह्यातील अधिकार्यांना निर्देश दिले. भंडारा, गोंदिया जिल्ह्यात वैनगंगा नदी, सूर नदी, बावनथडी नदी, चुलबंद नदी, वाघ नदी, येथील घाटावरून, नदीपात्रातून सर्रास अवैध रेतीचे उत्खनन केले जाते. करोडोचा महसूल डुबविल्या जातो. व पर्यावरण धोका निमार्ण होता आहे याकडे सर्व अधिकारी नेहमीच कान्हा डोळा करीत असतात. ट्रक व ट्रक्टर, जेसीबीच्या साहाय्याने रेती उपसा करून वाहतूक केली जाते. रस्त्याने ओव्हरलोड वाहतूक मोठया प्रमाणात होत आहे. शासनाने अजूनही काही रेती घाटाचे लिलाव केलेले नाही, त्यामुळे अनेक रेती माफीया या व्यवसायात सक्रिय झाले आहेत.
रोज रात्री व दिवसा अवैधरित्या रेतीचे उत्खनन केले जात आहेत. विना नंबर प्लेटच्या बर्याच रेती माफियांच्या गाड्या आहेत. तरीपण वाहतूक विभागाचे त्याकडे लक्ष नसल्याचे दिसते. आर्थिक देवाण घेवाणीमुळे संबधीत अधिकारी कारवाही करत नसल्याची चर्चा दोन्ही जिल्ह्यात होत आहे. संबधीत अधिकारी बघ्याची भूमिका घेत असल्याने रेती माफिया सक्रिय झाले असून त्यांची दहक्षत निर्माण झाली आहे. गुन्हेगारी तसेच अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शहरी व ग्रामीण भागात रस्त्याला ओव्हर लोड वाहतुकीमुळे खड्डे पडले असल्याने लोकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. घरकुल लाभार्थ्यांना आजही पुरेशी रेती मिळत नाही. अनेकदा लेखी अर्ज करून सुद्धा घरकुल लाभार्थ्यांना पाहिजे ती रेती दिल्या जात नाही. आता पावसाळा सुरू होत असल्याने, अवैध रेतीचे उत्खनन थांबविल्या गेले पाहिजे. पर्यावरण वर धोका होणार नाही लक्ष देया महसूल विभाग, पोलिस विभाग, खनिज विभाग, वाहतूक विभाग यांनी तात्काळ अवैध रेतीचे उत्खनन थांबवून रेती माफियांवर तातळीने कारवाई करावी. जनतेच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे असे भंडारा, गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत यादवरावजी पडोळे यांनी प्रशासनाला निर्देश दिले.
Post A Comment:
0 comments so far,add yours