प्रतिनिधि : सुनिता परदेशी
भंडारा : शहिद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर प्रणित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुवाबाजी संघर्ष विभाग यांच्या वतीने भगतसिंग वाढ नवीन टाकळी भंडारा येथील कार्यालयात भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने संविधान अमृत महोत्सव, घरघर संविधान, विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यंकटराव गायधने गुरुजी होते त्यावेळी त्यांनी सांगितले की लोकांनी लोकांसाठी चालवलेली शासन म्हणजे लोकशाही असून आम्ही भारताचे लोक या प्रास्ताविकेचे वाचन करून त्यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. बुवाबाजी संघर्ष विभागाचे राज्य सहकार्य वाह विष्णुदास लोणारे यांनी सांगितले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेले वीस वर्षांपासून संविधान बांधील की हा महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात राबवत असून महाराष्ट्र शासनाला पत्र देऊन विनंती केल्याने मागील वर्षीपासून घरघर संविधान हे महाराष्ट्र शासनाने उपक्रम सुरू केले असून संपूर्ण शासन दरबारी राबवीत असल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. 26/ 11/ला हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली देण्यात आली . या कार्यक्रमाला राजकुमार रामटेके, गणेश पून, पुरुषोत्तम गायधने, वरठी कार्याध्यक्ष त्रिवेणी वासनिक, मयूर गायधने, सायल लोणारे, सौ. कविता लोणारे प्रामुख्याने उपस्थित होते.



Post A Comment:
0 comments so far,add yours