जळगाव: 'माणसाने स्वप्न पाहणे आवश्यक आहे, मात्र स्वप्न असं पाहिले पाहिजे की चांगल्या चांगल्यांच्या झोपा या मोडल्या पाहिजे, जसे मी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहिले आणि अनेकांच्या झोप उडाल्या होत्या', असं विद्यार्थ्यांना उदाहरण देत पुन्हा एकदा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आपली खदखद बोलून दाखवली. निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमात भुसावळ येथे त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. 
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील नाहाटा विद्यालय येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि गुरुनाथ फाउंडेशनच्या वतीने निबंध स्पर्धेच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने खडसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयातील जीवनापासूनच आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करताना विद्यार्थ्यांनी मोठे होण्याचं स्वप्न पाहणे आवश्यक असल्याचा सल्ला दिला. मात्र, स्वप्न पाहताना असे स्वप्न पाहा की, ज्यामुळे अनेकांच्या झोप या उडाल्या पाहिजे, जसं मी मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहिलं आणि अनेकांच्या झोप त्यामुळे उडाल्या होत्या, अशा स्वरूपाचं उदाहरण देत खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातली सल या निमित्ताने व्यक्त केली आहे. 

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours