पुणे : विसर्जन मिरवणूकीसाठी ठरवून दिलेल्या फर्ग्युसन कॉलेज मार्गावर डीजे लावून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पुण्याती एका गणेश मंडळाच्या 10 पदाधिकाऱ्यांना डेक्कन पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. बुधवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.

सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, बुधवारी रात्री फर्ग्युसन कॉलेज रोडवर बाणेर येथील एका कंपनीच्या गणपतीची ही विसर्जन मिरवणूक होती. गणपती मूतीर्ची ट्रॅक्टरवर ठेऊन विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत एका टेम्पोमध्ये डीजेही लावण्यात आला होता. तसेच सोबत ५० वादकांचे ढोलताशा पथक देखील मार्गक्रमण करीत होते.

कंपनीचा गणपती असल्यामुळे या मिरवणुकीत कंपनीचे कामगार मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले होते. दरम्यान, फर्ग्युसन रोडवरील वाहतुकीचा या मिवरणुकीमुळे खोळंबा झाल. डीजेचा आवाज आणि ऐनवेळी मिरवणूकीसाठी दिलेला मार्ग बदलल्याचे पोलिसांतर्फे देण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. डीजेचा प्रचंड आवाज करत ज्ञानेश्वर पादुका चौकाकडून उलट दिशेने ही मिरवणूक काढण्यात आली असल्यामुळे आदेशाचा भंग झाल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी मंडळाच्या दहा पदाधिकाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिस अधीक तपास करीत आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours