नागपूर:  नागपूर शहरातील पोलिस आणि गुंडांच्या मैत्रीचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने उपराजधानीतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थीतीचे भयाण वास्तव पुढे आले आहे. शहरातील कुख्यात गुंड आणि तडीपार अशोक बावाजी आणि गँगस्टर आबूसह पोलीस काॅन्स्टेबल जयंत शेलोट बर्थ डे पार्टीत नाचत असल्याचा व्हिडिओनं पोलीस दलात खळबळ माजवलीये. अखेर या पण या काॅन्स्टेबलवर कारवाई करत निलंबन करण्यात आलंय.

राज्याची उपराजधानी नागपूरच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा हा डान्स बघा. कुख्यात गुंड आणि तडीपार असलेल्या अशोक बावाजी आणि गँगस्टर आबू सह पोलिस काॅन्स्टेबल जयंत शेलोट नाचताहेत. कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलिस काॅन्स्टेबल या गुंडासोबत आबूची बर्थडे पार्टी साजरी करतोय. ह्या पार्टीत आणखी काही पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते पण व्हिडिओ रेकार्डिंग होत असल्याचं पाहून ते पळून गेले.
धक्कादायक म्हणजे यातील कुख्यात गुंड अशोक बावाजी हा तडीपार असतांना शहरात कशी काय पार्टी आयोजित करतो असा प्रश्न उपस्थित होतो. तडीपारीचा नियम तोडून गुन्हेगाराने शहरात येण आणि  पोलिस काॅन्स्टेबलनं त्याच्या पार्टीला जाने हा गुन्हा आहे. पण पोलीस आणि गँगस्टरांचा ह्या डान्सच्या व्हिडिओने नागपूर पोलिसांच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली.  या काॅन्स्टेबलने पोलिसांच्या अब्रुच्या धिंडवड्या काढल्या त्या कमी होत्या की काय संदीप खंडारे या मद्यधुंद पोलीस काँस्टेबलने दारू पिऊन पंचशील चौकात धिंगाना घातला.
पोलीसचा शिपाई संदीप खंडारे रासायनिक प्रयोगशाळेत नमुने जमा करण्यासाठी आला होता. नमुने जमा केल्यानंतर तो पंचशील चौकातील बारमध्ये दारू प्याला. बारमधून निघाल्यावर पंचशील चौकातच तो गोंधळ घालू लागला. पोलिसांनी संदीपला ताब्यात घेतले. यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले अशी माहिती झोन 2 चे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी दिली.
नागपूर शहराला नवे पोलीस आयुक्त लाभले आणि त्यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी आॅपरेशन क्रँक डाऊनची सुरुवात केली. दोन हजार दोनशेच्या वर गुन्हेगारांची चौकशी झाली पण गुन्हेगारांचे पोलिसांसोबतचे संबध एका पाठोपाठ पुढे येताहेत.
शहरासाठी धोकादायक असणारे अनेक गुंड तडीपार असतांना शहरात सक्रिय झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहे. नागपूर शहराला संगिताचा कान असलेले पोलीस आयुक्त डाॅ भुषणकुमार उपाध्याय लाभले आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours