मुख्य सपादिका... सुनिता परदेशी
नागपूर : पंतप्रधान मोदींनी देशाचा विकास केला, अश्याप्रकारच्या बातम्या या माध्यमांत येतात. भाजप नेत्यांकडूनही आम्हीच विकास केला असे बोलले जाते. हे अपूर्ण सत्य आहे. नागपूरच्या बम्बलेश्वरीनगरातील नागरीक हे पिण्याच्या पाण्यासाठी वन वन भटकत आहे. रस्ते, मुलभूत सुविधा नाही. त्यामुळे येथील नागरीकांनी लोकसभा निवडणूकीचा बहिष्कार टाकला आहे. नितीन गडकरींनी साधा गल्लीचा विकास केला नाही. दिल्लीचा विकास दूरच रहाला,
असा प्रश्न येथील नागरीकांकडून केला जात आहे. गेल्या 20 वर्षा पासून नागपूर च्या (माजरी )वांजरा बमलेश्वरी नगर या क्षेत्रात नागरीक राहतात. या भागात एक रस्ता नाही. महानगर पालिका प्रभाग 4 मध्ये येणार हे क्षेत्र आजही दुर्लक्षित आहे. त्यामुळेच यंदा (माजरी ) वांजरा बमलेश्वरी नगर वासीयांनी लोकसभा निवडणुकीचा बहिष्कार टाकला आहे. वसाहतीत ठिकठिकाणी बहिष्काराचे फलक लागले आहे. येथील नागरिक म्हणतात की येथे समस्या खूप आहेत. पाणी, रस्ते, स्ट्रीट लाईट आणि महत्वाची म्हणजे सुरक्षा या वसाहतीत नाही. पावसाळ्यात तर परिस्थिती खूप वाईट होते. लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही. अशावेळी मतदान कश्याला करायचं असा सवाल बामलेश्वरी नगर निवासीयांनी केला आहे. मतदान करुन समस्यांचं समाधान होत नसेल, तर मतदानाचा बहिष्कार करणे हा पर्याय इथल्या लोकांनी निवडला आहे. या भागात फलक लावून बमलेश्वरीनगर वासीयांनी निवडणुकीचा बहिष्कार केला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मिहान येथे ५० हजार सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्याचे, आश्वासन पाच वर्षापूर्वी धंतोलीतील यशवंत स्टेडियम* येथे आयोजित एका कार्यक्रमात दिले होते. पण, मिहान येथे एकाही बेरोजगाराला रोजगार मिळालेला नाही. भाजपची सत्ता आल्यास स्वातंत्र विदर्भ करु अश्याप्रकारचे शपथपत्राद्वारे आश्वासन दिले होते. ते पूर्ण केले नाही. वाजत गाजत मोदींच्या हस्ते नागपूर मेट्रोच लोकार्पण झाल. पण, आज मेट्रो बंद आहे. 'एआयआयएमएस' चं भूमिपूजन झालं. पण एक विट सुध्दा लावली गेलेली नाही, असे प्रश्न येथील स्थानिक नागरिकां कडून केले जात आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours