नागपूर 18 ऑगस्ट : नागपुरमध्ये गुंडांचा धुमाकूळ काही शांत होण्याची चिन्हं दिसत नाहीत. विविध गुन्ह्यांनी कायम चर्चेत राहणाऱ्या नागपुरात आणखी एक धक्कादायक घटना पुढे आलीय. दोन गुंडांनी एका तरुणीच्या घरात घुसून तिची छेड काढल्याचं प्रकरण समोर आलंय. रात्री हे दोन गुंड तिच्या घरात शिरले आणि त्यांनी तिचा विनयभंग केला अशी तक्रार पीडित तरुणीने दाखल केलीय. हे दोनही गुन्हेगार पोलिसांच्या हिटलिस्टवर असून पोलिसांचा ते सापडत नाहीत मात्र शहरात घुसून राजरोसपणे गुन्हे करतात यावर तीव्र चिंता व्यक्त करण्यात येतेय.
मंगेश टिचकुले व लकी तेलंग अशी या दोन गुंडांची नावं आहेत. लकी हा मंगेशचा पंटर असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. या दोघांची दक्षिण नागपुरात दहशत आहे. तरुणी घरासमोर उभी होती. त्यावेळी लकी व मंगेश तिथे आले. दोघांनी तरुणीला शिवीगाळ करून नियंभंग केला. घटना घडल्यानंतर तरुणीने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी लकी व मंगेशविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी फरार असून आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी लकी व मंगेशविरुद्ध रविवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. जवळपास एक आठवड्यानंतर हे प्रकरण उघडतीस आलं असून. लकीविरुद्ध खुनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मंगेश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे.याआधीही त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours