रोशनी देशमुख अंदाजे वय 20 वर्ष राहणार फुटाळा डुग्गीपर जवळ ता.सडक अर्जुनी हल्ली मुक्काम सौंदड ही दि 17 तारखेला घरून कोणाला ही न सांगता निघून गेली होती(पोलीस स्टेशन डुग्गीपर इथे दिलेल्या तक्रारी वरून)आज लाखनी पंचायत समिती समोरील राधेशाम क्षीरसागर यांच्या घरी राहत असलेल्या एका मुलाने तीचा खून केल्याचे आजूबाजूच्या लोकांना त्या मुलाच्या रूम मधून घाण वास येत असल्यामुळे लक्षात आली.सदर मुलीचा देह पाहताना अशे लक्षात येते की तिचा संपूर्ण शरीर फुललेल्या अवस्थेत आहे.तीन मुलींच्या हत्याकांडा 6 वर्ष पूर्ण झाले त्याच अनुषंगाने लाखनित पुन्हा अश्या प्रकारे खून झाल्यामुळे लाखनी नगरीतील रहिवाशी अवाक झाले आहेत.
त्या मुलीचं खून कसा करण्यात आला?तिचा शरीर फुलला कसा काय?तिला विषारी औषदाचा इंजेकॅशन तर लावण्यात आला नव्हता?असा गुढ प्रश्न निर्माण झालेला आहे.



Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours