भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात औषधी चा मोठ्या प्रमाणात तुटवडा पडलेला काही दिवसांपासून दिसत आहे. पेशन्ट ला डाॅक्टर औषध लिहून देतात तेव्हा रूग्णालयात औषध राहत नाही  व पेशेन्ट ला बाहेरून आनावी लागत आहे. 
   सामान्य गोर गरीब, शेतकरी कष्टकरी जनता मोलमजुरी करून आपले कसे तरी जिवन जगते. जेव्हा पासुन बीजेपी व शिवसेना शासन आले व राज्याचे आरोग्य मंञी हे आपल्या जिल्हाचे पालक मंत्री सुध्दा होते तरी पण त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. 
   भंडारा जिल्हातील जनतेला असे प्रश्न निर्माण झाले की जी औषध जनतेसाठी दिली जाते ती बाहेर तर विकल्या जात नाही न असे वाटायला लागले आहे. 
      त्यामुळे भंडारा शहर काँग्रेस कमिटी तर्फे निवेदन सामान्य रूग्णालय भंडारा येथें देण्यात आले. याप्रसंगी काँग्रेस नेते धनराजजी साठवणे, शहर अध्यक्ष सचिन घनमारे, महिला अध्यक्षा भावना शेन्डे, माजी नगरसेवक पृथ्वीराज तांडेकर,मिर्जा बेग, जिवन भजनकर, अंबादासजी नंदुरकर, गणेश लिमजे, शमीम पठाण, भारती लिमजे, कमल साठवणे, प्रमोद लिमजे यावेळी उपस्थित होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours