भंडारा येथील वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचा व जवळपास 8 किमी रस्त्याचा पूर्ण अंदाजपत्रक  ला 32 करोड चा होता.पूल बांधल्यानंतरच लगेच कारधा येथे टोल नाक्याची निर्मिती करण्यात आली होती.
जवळ पास 18 ते 20 वर्षांपासून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाकडून टोल वसुली सुरु होती.मागील 5 ते 6 वर्षांपासून प्रत्यक दिवशी 8 ते 10 लाख टोल वसुली अशोका बिल्डकाँन कंपनी कडून करण्यात येत होते.अश्या प्रकारे आतापर्यंत अशोका बिल्डकॉन कंपनी ने जवळपास 200 ते 250 करोड रुपयांची टोल वसुली केली म्हणजेच प्रकल्प खर्चाच्या 7 ते 8 पट रक्कम ऐवडी वसुली केल्यानंतर सुद्धा ज्या टोल नाक्याची मुदत 18 फेब्रुवारी 2018 पर्यन्त च होती ती पुन्हा आज म्हणजेच 10 मार्च 2018 पर्यंत सुरू आहे.
  आणि आता गंभीर प्रश्न आजपर्यंत वैनगंगा नदी वरील पुलास काही झालं नाही परंतु क्षतिग्रस्त असल्याचे कारण देऊन
आता दुरुस्तीच्या नावाखाली नदीवरील पुलाच्या नावाखाली टोल ची मुदत वाढ करण्याचा नक्कीच हा प्रकार असून कंपनी कडून जिल्ह्यातील लोकांना मूर्ख बनविण्याचा प्रकार सुरू आहे. आतातरी जिल्ह्यातील नागरिकांनी जागे होऊन कारधा टोल बंद करण्यासाठी आवाज उठविला पाहिजे.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours