अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. राहुलजी गांधी यांच्या सूचनेनुसार सर्व शहर आणि जिल्हा काँग्रेसच्या वतीने
सोमवार दिनांक 9 एप्रिल
रोजी सकाळी 11 वाजता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गांधी चौक येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण आयोजित करण्यात आले आहे.
दि. 2 एप्रिल रोजी विविध संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान उसळलेल्या हिंसाचारात अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले. मागील काही वर्षांपासून संपूर्ण देशात सामाजिक सलोखा बिघडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. या घटनांचा निषेध करण्यासाठी लाक्षणिक उपोषण नियोजित केले आहे.
मा. खा. नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी माजी मंत्री तथा अनुसूचित जाती सेल चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ नितीन राऊत, जिल्हा प्रभारी प्रफुल्ल गुडगे पाटील, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, माजी मंत्री बंडुभाऊ सावरबांधे, माजी आमदार आनंदराव वंजारी, तसेच प्रदेश पदधिकारी व भंडारा जिल्हा व शहर कॉंग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी , सहकारी बैंकेचे पदाधिकारी व सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समिति, ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी, बाजार समितीचे सदस्य व पदाधिकारी, आजी व माजी नगरसेवक/नगरसेविका,
महिला काँग्रेस विभाग, अनुसूचित जातीजमाती विभाग, ओबीसी काँग्रेस विभाग, अल्पसंख्यांक काँग्रेस, युवक कॉंग्रेस, एनएसयूआय विभाग, शिक्षक काँग्रेस सर्व सेलचे पदाधिकारी, सेवा दल यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उपस्थित होते..
Post A Comment:
0 comments so far,add yours