मुंबई, 26 एप्रिल : उपनगरीय लोकलच्या मध्य, हार्बर आणि पश्‍चिम रेल्वेच्या फर्स्ट क्‍लासमधून यापुढे मुंबई पोलिसांना वैध पास किंवा तिकिटांशिवाय प्रवास करू नये, असे आदेशच मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांनी काढले आहे. त्यामुळे यापुढे फर्स्ट क्‍लासमध्ये मुंबई पोलिसांना नो एंट्री असणार आहे. पोलीस अधिकारी, कर्मचारी फर्स्ट क्‍लासमध्ये वैध पास अथवा तिकिटाशिवाय प्रवास करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते.
लोकल गाड्यांचे फर्स्ट क्‍लास डब्यातून प्रवाशांचा रेल्वे प्रवास सुखकर व्हावा म्हणून रेल्वे प्रशासनाकडून लोकल,  मेल आणि एक्सप्रेस या गाड्यांमध्ये फर्स्ट क्‍लासचे डब्बे वेगळे ठेवले आहे. अनेकदा ड्युटीवर येताना आणि जाताना काही पोलीस अधिकारी या डब्ब्यातून वैध तिकिटाशिवाय प्रवास करताना तिकिट तपासनीस यांना दिसून आले आहेत. पोलीस असल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होत नव्हती. मात्र, गेल्या काही महिन्यांत ड्युटीवर नसतानाही काही पोलीस अधिकारी फर्स्ट क्‍लासचा प्रवासादरम्यान वापर करताना दिसून आले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours