मुंबई: विधीमंडळ गटनेता निवडीसाठी सोमवारी काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये 3 नावांवर चर्चा करण्यात आली आहे. मुंबईत काँग्रेस विधीमंडळ गटनेता निवडीसाठी बैठक पार पडली. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विजय वड्डेटीवार आणि वर्षा गायकवाड यांच्या नावाची बैठकीत चर्चा झाल्याच समजतं आहे.
गटनेत्याची निवड करण्यासाठी अंतिम निर्णय हा दिल्लीत हायकमांडकडून घेतला जाणार आहे. आजच्या बैठकीत आमदारांकडून असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. काँग्रेस विधीमंडळ गटनेता निवडीचा अधिकार राहुल गांधी यांच्याकडून अंतिम होणार आहे. मल्लिकार्जून खरगे यांनी यासंबंधी प्रत्येक आमदारांशी चर्चा केली.
आजच्या बैठकीत सध्याची राजकीय स्थिती, कोण गटनेता असावा यावर चर्चा करण्यात आली. येणारी विधानसभा निवडणूकीची तयारी यानुसार केली जाईल अशी माहिती काँग्रेस आमदार नसीम खान यांनी दिली.

काग्रेस विधीमंडळ गटनेते पदासाठी नावांची चर्चा  
बाळासाहेब थोरात
- काँग्रेस ज्येष्ठ नेते, माजी महसूल कृषी मंत्री
- पाच वेळेपेक्षा जास्त आमदार टर्म
- मराठा चेहरा, भ्रष्टाचाराच्या आरोप नाही
- विखे यांना पर्याय म्हणून थोरात यांना प्राधान्यान
- एनसीपी नेत्यासमवेत जुळवून घेत काम करण्याची कसब
बाळासाहेब थोरात यांची कमतरता
- आक्रमक कमी
- महाराष्ट्रात सर्वदूर प्रभाव कमी
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours