बीड: बीड लोकसभा निवडणुकीची मत मोजणीसाठी प्रशासनांकडून सर्व व्यवस्थाकरण्यात आली आहे. बीड लोकसभेचा निकाल महाराष्ट्रामध्ये सर्वात उशिरा लागणार असल्याचे संकेत आहेत. विद्यमान खासदार प्रीतम मुंडे, राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचे भवितव्य काय असणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.
बीड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. प्रशासन सज्ज झाले आहे. सकाळी आठ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होणार आहे. 2325 मतदान केंद्र असणाऱ्या बीड लोकसभेसाठी 169 मतमोजणी फेरीसंख्या असणार आहे. 37 उमेदवार असल्यामुळे तीन व्हीव्हीएम मशिन प्रत्येकवेळी तपासणी करावी लागणार असल्याने राज्यातील बीड जिल्ह्याचा निकाल सर्वात उशिरा लागणार आहे.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी 14 टेबल आणि एक पोस्टल मतासाठीचा टेबल असणार आहे. एकूण 84 टेबलवर मतमोजणी केली जाणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासनाचा मोठा फौजफाटा तैनात केला जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या नेमणूका पूर्ण झाल्या आहेत.

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे.  मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे 23 तारखेला बीडचा गड कोण राखणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours