पुणे: पुण्यात शुक्रवारी एक अनधिकृत होर्डिंग थेट रस्त्यावर कोसळलं. आणि सिग्नलवर गाडी घेऊन उभ्या असलेल्या 4 जणांचं आयुष्यच हिरावून घेतलं..
या दुर्घटनेत 4 कुटुंबांनी त्यांच्या घरातली जीवलग माणसं गमावली... त्यातलंच एक परदेशी कुंटूंब...हे कुटुंबच आज पोरकं झालंय.
शिवाजी परदेशी.. पुण्यातले रिक्षाचालक...काही दिवसांपूर्वी हे जग सोडून गेलेल्या आपल्या पत्नीच्या अस्थी विसर्जित करुन शुक्रवारी ते आळंदीहून पुण्याला परत येत होते.
रिक्षा जुन्या बाजारातील शाहीर अमर शेख चौकात सिग्नलला थांबली. शिवाजी विचारात हरवले होते.
Post A Comment:
0 comments so far,add yours