मुंबई: अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केलीये. मुंबईतील ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये तनुश्री नाना पाटेकर, गणेश आचार्य यांच्याविरोधात तक्रार दाखल केलीये.
तनुश्रीने टि्वट करून तक्रार दाखल केल्याचं सांगितलंय.
२००८ मध्ये हाॅर्न ओके प्लीज या सिनेमाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी माझ्यासोबत गैरवर्तन केलं असा आरोप तनुश्रीने केला होता. याच सिनेमातील ज्या गाण्यावर वाद निर्माण झाला त्या गाण्याचे गणेश आचार्य हे कॉरियॉग्राफ होते. नाना आणि तनुश्रीमध्ये वाद झाल्यानंतर गणेश आचार्यने नानांची बाजू घेतली होती. त्यावरून तनुश्रीने गणेश यांना खोटारडा आणि दुटप्पी माणूस म्हणून टीका केली होती.
तनुश्रीने पोलिसांत तक्रार दाखल करण्याआधी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.अखेर आज तिने पोलिसांत तक्रार दाखल केलीये. अभिनेते नाना पाटेकर, निर्माते सामी सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग आणि कोरिओग्राफर गणेश आचार्य ह्यांच्याविरोधात अभिनेत्री तनुश्री दत्ताने ओशिवरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
Post A Comment:
0 comments so far,add yours