मुंबई, 16 ऑक्टोबर: राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. मुंबई दक्षिणात्य भारतीयांविरोध 'उठाव लुंगी, बजाव पुंगीचा नारा' देणाऱ्या शिवसेनेला आता मतांसाठी लुंगी घालण्याची वेळ आली आहे. एकावेळी फक्त मराठी माणसांच्या हक्कासाठी, रोजगारासाठी आणि न्याय मिळावा म्हणून लढणाऱ्या शिवसेनेला आता उत्तर भारतीय आणि दाक्षिणात्य भारतीयांकडे मत मागण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे.

मात्र जवळपास सहा दशकांत पुलाखालून बरचं पाणी गेलं आहे. आता शिवसेनेच्या वाघानंही आपली चाल बदलली.ऐकेकाळी लुंगी विरोधात नारा देणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य ठाकरेंनी मात्र मतांच्या जोगव्यासाठी लुंगी परिधान केली.मुंबईच्या वरळी मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून प्रचारादरम्यान त्यांचं हे रुप पाहायला मिळालं. वरळीत मराठी बहुसंख्य असले तरी इतर भाषिक मतदारांची संख्याही बऱ्यापैकी आहे. निवडणुकीत सगळ्यांनाच सोबत घेऊन जाण्याची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळं विरोधकांनाही शिवसेनेवर टीका करण्याची आयतीचं संधी मिळाली. याआधी वरळीमध्ये आदित्य ठाकरेंच्या प्रचाराचे गुजराती भाषेत बॅनर झळकले होते. त्यावरुनही बराच वाद झाला होता.

निवडणूक लढवणारे  आदित्य ठाकरे हे त्यांच्या कुटुंबातील पहिले सदस्य ठरले आहेत. त्यामुळे त्यांची निवडणुक लक्षवेधी ठरली. खरं तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वरळी परिसरात गुजरातीसह विविध भाषांमध्ये त्यांचे होर्डिंग  झळकले होते.त्यामुळंही त्यांना टीकेचं धनी व्हावं लागलं होतं.  आता लुंगीमुळं पुन्हा एकदा त्यांना टीकेला सामोरं जावं लागतं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours