राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण हे एक मोठ्या षडयंत्राचा एक भाग होता, पोलिसांनी या प्रकरणी अनेक ठिकाणी छापे टाकले, त्यात अशा घटनांचा कट रचला जात होता असा दावा केलाय. यातील काही जण हे माओवाद्यांना सोबत घेऊन हे कृत्य करणार होते. स्वत:ला वाचवण्यासाठी ते सुप्रीम कोर्टात गेले पण निर्णय आमच्याच बाजूने लागला असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी 16व्या हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिटमध्ये हे वक्तव्य केलंय. मी डाव्या किंवा उजव्या विचारसरणीच्या लोकांना ओळख नाही जी लोकं राज्यघटनेच्या विरोधात काम करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले.
२८ सप्टेंबरला फडणवीस यांनी मागील वर्षी १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी ५ माओवादीसंबंधी विचारवंताविरोधात राज्य पोलिसांकडून चौकशीत दखल देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं.
सुप्रीम कोर्टाचा निर्णय सिद्ध करतोय की, पोलिसांनी वरवर राव, अरुण परेरा,वर्णन गोन्साल्विस, सुधा भारद्वाज आणि गौतम नवल्खा यांच्याविरोधात कट रचण्याचा आरोप करून २९ आॅगस्टपासून घरात नजरकैदेत ठेवण्यात आलंय असंही फडणवीस म्हणाले.
या प्रकरणानंतर राजकीय पक्षांनी याचा फायदा उचलला. अटक करण्यात आलेल्या पाचही जणांचे या राजकीय पक्षांनी समर्थन केलं हे चुकीचे होते. त्यामुळे या राजकीय पक्षांचा चेहरा समोर आलाय अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.
अशी झाली कारवाई
तेलुगू विद्रोही कवी वरवरा राव, अरूण परेरा आणि वर्णन गोन्सॅल्विस या तिघांना २८ आॅगस्टला अटक करण्यात आलीय. पुण्यात 31 डिसेंबर 2017ला शनिवारवाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेसाठी माओवाद्यांनी पैसा पुरवल्याचा आरोप आहे. दरम्यान, या अटकसत्राविरोधात हैदराबादमध्ये निदर्शनं झाली. प्रकाश आंबेडकर यांनीही या कारवाईविरोधात टीकेची झोड उठवली आहे.
पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे, वकील सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, रॉना विल्सन आणि प्राध्यापक शोमा सेन यांना अटक केली होती. या चौघांच्या 200 ईमेलची तपासणी केली असता पुणे पोलिसांना अन्य काही जणांसंदर्भात महत्त्वाची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापेमारी करत 5 जणांना अटक केली होती.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours