07 आॅक्टोबर : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार मावळमधून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झालीये.
कारण खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारच याबाबत अनुकूल नसल्याचं कळतंय.
स्वत: अजित पवार यांनी पार्थच्या उमेदवारीचे संकेत दिले होते. मात्र घरातल्यांनीच निवडणुका लढवल्या तर कार्यकर्त्यांचं काय? असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केलाय. मुंबईत राष्ट्रवादीची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी पार्थच्या उमेदवारीला शरद पवारांनी थेट विरोध केला नसला तरी पक्षबांधणी करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार असं सूचक विधान केल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.
पार्थ पवार हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहे. पक्षाच्या विविध कार्यक्रमात ते सहभागी होत असतात. पार्थ पवार हे मागील निवडणुकीतच सक्रीय सहभागीही झाले होते. आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पार्थ पवार यांचं नाव पुढे आलंय. मावळ लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार याच्या नावाची चर्चा सुरू आहे.
पार्थ पवार हे मावळ लोकसभा निवडणूक लढवणार का, यांवर अजित पवार यांना सवाल केला असता त्यांनी अत्यंत सूचक उत्तर दिलं.
मुलं मोठी झाली आहेत त्यांचा निर्णय ते स्वत: घेऊ शकतात असं अजित पवार यांनी म्हटलंय.
त्यामुळे पार्थ पवार यांच्या राजकीय प्रवेश कधी होणार आणि लोकसभा निवडणूक लढवण्यावर यावर कधी शिक्कामोर्तब याकडे सगळ्याचं लक्ष्य लागलं होतं. पण आता मोठ्या पवारांनी नकार दिल्यामुळे पार्थच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्हं निर्माण झालंय.
Post A Comment:
0 comments so far,add yours