मुंबई : 'एक्झिट पोल'चं कारण देत ऐश्वर्या रॉयवर ट्विट करणं अभिनेता विवेक ओबेरॉयला भोवणार आहे. या ट्विटची आता राष्ट्रीय आणि राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाने विवेक ओबेरॉयला नोटीस पाठवली असून स्पष्टिकरण मागितलं आहे. विवेकच्या या कृतीवर सोशल मीडियातून चौफेर टीका झाली होती.  त्यानंतर दबाव आल्याने राज्य आणि राष्ट्रीय महिला आयोगाला त्याची दखल घ्यावी लगाली.
विवेक ओबेरॉयवर चौफेर टीका
महिलांचा अपमान करणार्‍या विवेक ओबेरॉय यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. सिनेअभिनेता विवेक ओबेरॉय हे भाजपला समर्थन देऊन महिलांबाबत मर्यादा सोडून अपशब्द बोलत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा अशी मागणी नवाब मलिक यांच्याकडून करण्यात आली आहे.

'एक्झिट पोलच्या नावाखाली एका पद्मश्री मिळालेल्या महिलेचा अभिनेता विवेक ओबेरॉय अपमान करत आहेत. महिला आयोग कुठे झोपलं आहे' असा संतप्त सवाल नवाब मलिक यांनी यावेळी उपस्थित केला होता.
विवेक ऑबेरॉय रविवारी लागलेल्या एक्झिट पोलवर एक ट्वीट शेअर केलं होतं. या ट्वीटमध्ये विवेकने दुसऱ्या एका युझरचं मीम शेअर केलं. या मीममध्ये विवेक स्वतः असून ऐश्वर्या राय, सलमान खान आणि अभिषेक बच्चनही दिसत होते. विवेकने हे मीम शेअर करत फक्त एग्झिट पोलचीच थट्टा उडवली नाही तर ऐश्वर्या रायचीही थट्टा उडवली होती.
विवेकने शेअर केलेल्या मीममधील पहिल्या फोटोत सलमान आणि ऐश्वर्या होते. या फोटोला 'ओपिनियन पोल' असं कॅप्शन दिण्यात आलं होतं. दुसऱ्या फोटोमध्ये विवेक आणि ऐश्वर्या दिसत होते. या फोटोवर 'एग्झिट पोल' असं लिहण्यात आलं होतं. तर तिसऱ्या फोटोमध्ये ऐश्वर्या अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्यासोबत होती. या फोटोला  'रिझल्ट' असं कॅप्शन देण्यात आलं होतं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours