मुंबई, 21 मे : केदारनाथानच्या गुहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं ध्यान म्हणजे नौंटकी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मुंबईतील इस्लाम जिमखाना येथे इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी बोलत असताना शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र डागलं. सरकारमध्ये बसलेल्यांनी लोकांच्या समस्यांचे निराकरण करणं गरजचं आहे. पण, सरकार चालवणारे राजधानी सोडून हिमालयात जाऊन बसल्याचा टोला यावेळी शरद पवार यांनी लगावला.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी गुहेत ध्यानधारणा देखील केली होती. त्यावरून अनेकांनी त्यांना लक्ष्य केलं होतं. शिवाय, त्यांच्या फोटोंची सोशल मीडियावर नेटीझन्सनं देखील खिल्ली उडवली होती. त्यानंतर आता शरद पवार यांनी देखील नरेंद्र मोदींवर टीकास्त्र डागलं आहे.
वृत्तवाहिन्या कठपुतली बाहुल्या 
दरम्यान, काही वृत्तवाहिन्या सरकारी पक्षाच्या हातातील कठपुतली बाहुल्या बनल्या आहेत. अनेकांनी याबाबत माझ्याकडे फोन करून चिंता व्यक्त केली. मात्र, आता चिंता करण्याचं कारण नाही. येत्या काही दिवसांत चित्र स्पष्ट होईल अशी प्रतिक्रिया देखील यावेळी शरद पवार यांनी दिली.
एक्झिट पोलचे अंदाज
रविवारी संध्याकाळी जाहीर झालेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार देशात एनडीएची सत्ता येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, राज्यात देखील शिवसेना - भाजप युतीला यश मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीला चांगलं यश मिळताना एक्झिट पोलमध्ये दिसत नाही. त्यामुळे आता 23 मे रोजी लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours