आपणांस विनंती की, भंडारा शहरातील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) आणि इतर शासकीय घरकुल योजनांच्या अनेक लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी रेती (वाळू) मिळण्यास मोठ्या अडचणी येत आहेत.

रेती उपलब्ध नसल्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे बांधकाम थांबले आहे. बाजारा मधे उपलब्ध असलेली रेतीचे मुल्ये अतीसय अधिक असल्यामुळे लाभार्थ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

यासाठी, खालील उपाययोजना त्वरित करावी, अशी आमची नम्र विनंती आहे:

१. शासकीय घरकुल लाभार्थ्यांसाठी रेतीचा पुरवठा त्वरित आणि नियमितपणे सुरू करावा.

२. घरकुल बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या रेतीचे परवाने त्वरीत मिळावेत.

३. भंडारा नगरपरिषद घरकुल धारकांना भंडारा लगत असलेल्या रेती डेपो किंवा नदी घाटावरुन रेती उपलब्ध करुण देण्यात यावे.

आपण या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन घरकुल लाभार्थ्यांना दिलासा द्याल, अशी अपेक्षा आहे.


 

Share To:
Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post A Comment:

0 comments so far,add yours