रुद्रीका परदेशी (शहर प्रतिनिधि)
भंडारा- महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाल यांनी सांगितलं आहे की राज्य सरकार गुटख्याची विक्री पूर्णपणे रोखण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मोक्का लागू करण्याचा विचार करत आहे. राज्यात गुटख्यावर आधीपासून बंदी असली तरी गुटखा आणि तंबाखूयुक्त पदार्थांची बेकायदेशीर विक्री मोठ्या प्रमाणात सध्या सुरु आहे. बाहेरच्या राज्यातून गुटखा महाराष्ट्रात आणला जात असल्यामुळे विद्यार्थी आणि तरुणांचं मोठे नुकसान होत आहे. मंत्र्यांच्या कार्यालयाकडून दिलेल्या माहितीमध्ये झिरवाल यांनी सांगितलं की गुटखा तयार करणाऱ्या कंपन्यांचे मालक, प्रमुख संचालक आणि या बेकायदेशीर व्यापारामागील सूत्रधारांविरुद्ध मोक्काच्या कठोर तरतुदी वापरण्याचासरकारचाविचार आहे. उत्पादन आणि विक्रीला बंदी असूनही अनेक लोक यामध्ये सहभागी होत असल्यामुळे कडक कायदेशीर कारवाईची गरज निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात गुटखा आणि पान मसाल्याची वाहतूक आणि विक्रीचे प्रकार सतत समोर येत आहेत. यामुळे गुटखा बंदी प्रभावी पद्धतीने अंमलात येत नाही, अशी परिस्थिती आहे. याच पार्श्वभूमीवर मोक्का लागू करण्यासंबंधी मार्गदर्शन मागणारा प्रस्ताव कायदा आणि न्याय विभागाकडे पाठवण्यात येईल. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. मंत्रालयात झालेल्या बैठकीत झिरवाल यांनी सांगितले की राज्य सरकार गुटखा बंदीची अंमलबजावणी आणखी कडक करणार आहे. विविध विभागांना जिल्हा पातळीवर जागरुकता मोहिमा राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गुटखा आणि तंबाखूजन्य पदाथार्मुळे होणाऱ्या कर्करोगासारख्या गंभीर आजारांबद्दल नागरिकांना जास्तीत जास्त माहिती देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात अनेक वेळा छापे टाकून गुटखा जप्त करण्यात आला असला तरी बेकायदेशीर व्यापार पूर्णपणे थांबलेला नाही. त्यामुळे मोक्का सारखा कठोर कायदा लागू केल्यास या प्रकारांवर गुटखा विक्रीवर नियंत्रण मिळवणं सोपं होईल, असं सरकारचे मत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गुटखा विक्री करणा? यांवर आणि बेकायदेशीर साठा ठेवणा? यांवर मोठा आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



Post A Comment:
0 comments so far,add yours