दिपक वाघमारे (प्रतिनिधि)
भंडारा - LCB विभागाने बेला परिसरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफास करण्यात भंडारा पोलिसांना यश आले आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तरीत्या केलेल्या या कारवाईत ३ पीडित महिलांची सुटका करण्यात आलो असून, एका महिला दलालासहित ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई २० नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आली. जिल्ह्यातील स्त्रियांचा देहव्यापार, मानवी तस्करी आणि बालकांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष कार्यरत आहे. या कक्षाचे प्रभारी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव पुंजरवाड आणि विशेष अधिकारी म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिनांक २० नोव्हेंबर २०२५ रोजी अनैतिक मानवी वाहतूक कक्षाला गुप्त माहिती मिळाली होती की, मौजा बेला येथे अवैध देहव्यापार सुरू आहे. या माहितीची खात्री पटताच पोलीस पथकाने सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला यावेळी घटनास्थळी एक महिला आरोपी आणि चार पुरुष आरोपी आढळून आले. तसेच वेश्याव्यवसायासाठी बळजबरीनेजुंपण्यात आलेल्या तीन पीडित महिलांची पोलिसांनी सुटका केली. पोलिसांनी सर्व पीडित महिलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांची रवानगी सखी वन स्टॉप सेंटर', भंडारा येथे केली आहे. या प्रकरणी मुख्य महिला आरोपी व अन्य ४ पुरुष अशा एकूण ५ जुंपण्यात आलेल्या तीन पीडित महिलांची पोलिसांनी सुटका केली. पोलिसांनी सर्व पीडित महिलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांची रवानगी सखी वन स्टॉप सेंटर', भंडारा येथे केली आहे. या प्रकरणी मुख्य महिला आरोपी व अन्य ४ पुरुष अशा एकूण ५ जणांविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ च्या कलम ३, ४, ५ (१) (क) अन्वये गुन्हा (अपराध क्रमांक १६१४/२०२५) दाखल करण्यात आला आहे. ही घडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अधिकारी तथा पोलीस निरीक्षक (LCB) नितीन चिंचोळकर, अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचे प्रभारी सपोनि केशव पुंजरवाड, तसेच अंमलदार अंकुश गाढवे, अंकोश पुराम, योगेश ढबाले, सपोनि केशव पुंजरवाड, तसेच अंकोश पुराम, योगेश ढबाले, कौशिक गजभिये, महिला पोलीस हवालदार अर्चना कुथे, मपोशि घरडे आणि मानिक किरसान यांनी केली. या कारवाईमुळे अवैध व्यवसायांचे धाबे दणाणले असून पोलीस पथकाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. जणांविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ च्या कलम ३, ४, ५ (१) (क) अन्वये गुन्हा (अपराध क्रमांक १६१४/२०२५) दाखल करण्यात आला आहे. ही घडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अधिकारी तथा पोलीस निरीक्षक (LCB) नितीन चिंचोळकर, अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचे प्रभारी सपोनि केशव पुंजरवाड, तसेच अंमलदार अंकुश गाढवे, अंकोश पुराम, योगेश ढबाले, कौशिक गजभिये, महिला पोलीस हवालदार अर्चना कुथे, मपोशि घरडे आणि मानिक किरसान यांनी केली. या कारवाईमुळे अवैध व्यवसायांचे धाबे दणाणले असून पोलीस पथकाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



Post A Comment:
0 comments so far,add yours