पोलिसांच्या संगनमताने जंगलराज आणण्याचा आरोप 

  भाज पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषदेतून मागणी        

सुरज पाठडिवडे : तालुका प्रतिनिधी

भंडाराः सोशल मीडियावर पोष्ट व्हारल ना करताही भंडारा येथील भाजपच्या महिला उमेदवाराला रात्री १.३० वाजता पोलिसांनी बरून नेवून त्याचा मोबाईल जप्ती केल्याप्रकरणी भंडारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भुसारी यांना तात्काळ निलंबीत करण्यात यावे किंवा निवडणुका होईपर्यंत भंडारा पोलीस स्टेशनमधून हटविण्यात बावे. अशी मागणी भाजपच्यावतीने आज घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेतून करण्यात आली. पत्रपरिषदेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आशिष गोंडाणे, जॅकी रावलानी, नितीन कारेमोरे, मगवान बावणकर, विनोद मुरे, सौ. सुषमा विनोद मुरे यांच्यासह इतर पदाधिकारी व तेली समाज पंचकमेटीचे पदाधिकारी उपस्थित होते. दि. २३ नोव्हेंबर रोजी रात्री १.३० वाजताच्या दरम्यान भंडारा येथील एपीआय खांदाळे व काही पोलीस त्यांच्या प्रभाग क्र. ७ च्या उमेदवार मनिषा मुरे यांच्या बरो गेटला कुलूप लावला असतांना गेटवरून चढुन आतमध्ये गेले त्यांनी त्यांचे पती विनोद भुरे बाला तुम्ही सोशल मीडियावर एक पोष्ट व्हायरल केली असे सांगून रात्री जबरदस्तीने पोलीस गाडीमध्ये बसवून शुक्रवारी येथील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आणले. त्यानंतर त्याचा मोबाईल ताब्यात घेवून पोलिसांनी त्याला पुन्हा घरी सोडून दिले. हा आमच्या उमेदवारांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. पोलिसांनी स्थानिक आमदारांच्या दबावात ही कारवाई केली आहे. वास्तविक पाहता सदर पोष्ट अॅड. मनजित कौर बांच्या मोबार्ईलवरून शिवसेनेच्या एका महिला उमेदवाराच्या विरोधात व्हायरल करण्यात आली होती. त्यांच्यावर कारवाई करायला हवी होती. मात्र विनोद भुरे यांनी कोणतीही पोष्ट व्हायरल केली नसतांना त्यांना नाहक त्रास देण्यात आला. त्यांना बदनाम करण्यात येत आहे. आमदाराच्या दबावात हे सर्व करण्यात येत आहे. यामुळे या प्रकरणात भंडारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार मुंसारी यांना तात्काळ निलंबीत करण्यात यावे, किंवा निवडणुकी पर्यंत भंडारा पोलीस स्टेशनमधून हटविण्यात यावे तसेच मुसारी यांनी विनोद भुरे यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष आशिष गोंडाणे यांनी केली. भाजपात पैसे देवून उमेदवारी देण्यात येत नाही. उलट आमच्या पदाधिकारी यांना पैसे देवून त्यांच्याकडून राजीनामा लिहून घेण्यात येत आहे. भाजप हा सुसंस्कृत लोकांचा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. असेही आशिष गोंडाणे म्हणाले. विनोद भुरे यांचे प्रकरण आज भाजप पदाधिकाऱ्यांना माहिती होताच त्यांनी पोलीस अधिक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक यांची भेट घेतली. त्यांनी आमच्याकडून असे कोणतेही आदेश देण्यात आले नव्हते. आम्ही या प्रकरणाचा तपास घेवू व ठाणेदार भुसारी यांच्यावर कारवाई करे असे सांगितले. वास्तविक अभय भागवत यांनी केलेल्या तक्रारीत विनोद भुरे यांचे नाव नसल्याचे जॅकी रावलानी यांनी सांगितले.

माझ्या जिवाला काही झाल्यास आ.भोंडेकर जबाबदार : जॅकी रावलानी 

आमदार नरेंद्र भोंडेकर हे माझ्या नातेवा ईकांच्या घरी जावून जॅकी रावलानी यांना त्यांच्या प्रभाग चा-रमध्ये राहायला सांगा, अन्यथा निवडणुकीनंतर जॅकी रावलानी याचा गेम करू असे सांगत आहेत. यामुळे माझ्या जीवाला पुढे कोणताही धोका आला तर त्याला आमदार नरेंद्र भोंडेकर हेच जबाबदार राहतील. निवडणुक येतील व जातील मात्र मी अशा धमक्यांना घाबरत नाहीत, मुर्खच व्यक्ती असे काम करू शकतो. मी उद्या पोलीस संरक्षणाची मागणी करणार आहे. भाजपच्या काळात युपी बिहार सुधरला. पण आता त्यापेक्षा बेकार भंडारा येथील परिस्थिती करण्याचा आमदार भोंडेकर प्रयत्न करीत असल्याचा भोंडेकर हे मला रिती चोर म्हणतात. मग माझ्याच नावाच्या फॉरच्यूनर गाडी क्र. एमएच ३६ एक १२१२ ने मुंबईत का फिरतात? असाही प्रश्न जॅकी रावलानी यांनी उपस्थित कर आहे.


अन्यथा भंडारा पोलीस स्टेशन सामोर ठिय्या आंदोलन उभारुः भंडारा जिल्हा भाजपचा इशारा.....


Share To:
Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post A Comment:

0 comments so far,add yours