पुणे : मराठा आरक्षणासाठी आता यापुढे रस्त्यावर नाही तर शांततेनेच आंदोलन करू, आंदोलनात झालेला हिंसाचार हा काही समाजकंटकांनी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी केला असा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने केला. पुणे जिल्हा समन्वय समितीने आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमीका स्पष्ट केली. औरंगाबादमधल्या वाळूंज एम.आय.डी.सी परिसरात आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या तोडफोड प्रकरणीही समितीने आपली भूमिका स्पष्ट केली. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात फक्त काच फुटली होती. त्यामुळे झालेलं नुकसान हे समन्वय समितीच्या वतीन भरून देण्यात येईल असं समितीच्या वतीने सांगण्यात आलं.

वाळूंज एम.आय.डी.सीतल्या कामगारांचे पगार थकल्याने त्यांनी हिंसाचार केला. यात आंदोलकांचा सहभाग नव्हता. यापुढे आत्मक्लेश आणि चक्री उपोषण करून आंदोलन करण्यात येईल अशी घोषणाही समन्वय समितीच्या वतीने करण्यात आलीय. औरंगाबादमध्ये होणाऱ्या राज्य समन्वय समितीच्या बैठकीत ही भूमिका मांडण्यात येणार असून राज्यभर शांततेच्याच मार्गाने आंदोलन करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours