मुंबई : नालासोपारामधल्या स्फोटकं जप्त प्रकरणी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर आणि नालासोपारामध्ये मोठा घातपात घडवण्याचा आरोपींचा कट होता, अशी माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिलीय. एटीएसनं अटक केलेला हिंदुत्ववादी सनातनी कार्यकर्ता वैभव राऊतला त्याच्या दोन साथीदारांसह न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी तपासयंत्रणेच्या हाती लागलेली माहिती सरकारी वकिलांना कोर्टाला सादर केली. आरोपी वैभव राऊतकडून 20 बॉम्ब आणि 2 जिलेटीन कांड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. वैभवच्या चौकशीदरम्यान ज्या दोघांची नावं समोर आली त्या शरद कळस्कर आणि सुधन्वा गोंधळेकर या दोघांनाही अटक केलीय. आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई एटीएसनं नालासोपाऱ्यातल्या भांडार अळीमधल्या वैभव राऊतच्या घरी छापा मारून स्फोटकं जप्त केली. आणि घातपाताचा मोठा कट उधळलाय. दरम्यान आरोपीच्या वकिलांनी सरकारनं लावलेले आरोप फेटाळवले आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours