मुख्य सपादिका... सुनिता परदेशी
केंद्रीय कापूस अनुसंधान संस्था, नागपूर व शेतकरी न्यायहक्क आंदोलन समिती, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने कापूसतज्ञांच्या राष्ट्रव्यापी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते स्व.दादासाहेब कोल्हे सभागृह, दारव्हा रोड, यवतमाळ येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. यात बी.टी.बियाणे, गुलाबी बोंड अळी, कीटकनाशक फवारणी विषबाधा यामुळे शेतक-यांभोवती निर्माण झालेला कपाशीचा चक्रव्यूह व त्याचे शेतक-यांच्या जीवनावर होत असलेले परिणाम यावर सखोल चर्चा करण्यात आली, शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
या परिषदेचे उदघाटन माजी खासदार नानाभाऊ पटोले यांचे हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव कासावार होते. शेतकरी नेते तथा दै.देशोन्नतीचे एडीटर इन चिफ प्रकाश पोहरे, दै. सकाळ विदर्भ आवृत्तीचे संपादक शैलेश पांडे, यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. या परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी ख्यातनाम कापूस तज्ञ डॉ.पं.दे.कृ.विद्यापीठ अकोला चे माजी कुलगुरू डॉ.शरद निंबाळकर, नागपूरचे कृषी तज्ज्ञ शरद पवार, कापूस अनुसंधान संस्था, नागपुरचे संचालक डॉ.व्हि.एन.वाघमारे, पॅन इंडीया, हैदराबादचे संचालक डॉ.डी.नरसिम्हा रेड्डी, केंद्रीय कापूस अनुसंधान संस्था, नागपुरचे प्रिन्सीपल सायंटीस्ट डॉ.व्हि.एस.नगरारे, पेस्टीसाईड्स असोसिएशन ऑफ इंडीया, नवी दिल्लीचे बसवेश्वर घोडकी, सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे डॉ.शालीग्राम वानखडे, केंद्रीय कापूस अनुसंधान संस्था नागपुरचे माजी विभागप्रमुख टी.व्ही.कठाणे, पॅन इंडिया केरळचे संशोधक समन्वयक दिलीप कुमार, शेतकरी नेते गजानन अमदाबादकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष मनीष पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कापूस व त्याचे उत्पादन घेणारे शेतकरी यांना केंद्रस्थानी ठेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सविस्तर चर्चासत्रात मान्यवरांनी मौल्यवान विचार व्यक्त केले. यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भाचे मुख्य पिक असलेल्या कापूस पिकावरील सममस्यांचे मळभ दुर करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे संचालन कृषी अभ्यासक प्रा. मिलिंद राऊत व साहेबराव पवार यांनी केले.
Post A Comment:
0 comments so far,add yours