मुंबई, 15 मार्च : महाराष्ट्र सरकारकडून मुंबई ते नागपूर दरम्यान 701 किमी लांबीचा एक्सप्रेस-वे तय़ार केला जात आहे. यामुळे हा प्रवास काही तासांमध्येच पूर्ण करता येणार आहे. याच्या पार्श्वभूमीवर मुंबई – गोवा एक्सप्रेस-वे योजनेची घोषणा शनिवारी करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी शनिवारी अप्पर हाऊस (Uppar house) येथे मोठी घोषणा केली. लवकरच मुंबई ते गोवा (Mumbai – goa ) हा प्रवास अवघ्या 4 ते 5 तासांत पूर्ण करता येणार आहे. मुंबई - नागपूर (Mumbai – Nagpur) समृद्धी महामार्गाच्या (500 किमी ग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वे) पार्श्वभूमीवर सरकारकडून ही योजना आखण्यात येणार आहे, सध्या या प्रवासात 11 ते 13 तासांचा वेळ जातो.
यासंदर्भात MSRDC ने या प्रकल्पादरम्यान निसर्गाला कोणताही धोका पोहोचणार नाही, अशा स्वरुपाच्या प्रकल्पाच्या अहवालाची मागणी केली आहे. समृद्धी महामार्गादरम्यान लाखो झाडे कापण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मात्र मुंबई – गोवा एक्सप्रेस-वे तयार करताना निसर्गाला हानी पोहोचणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. यासंदर्भातील अहवाल तयार करण्यात येणार आहे.
या एक्सप्रेस-वेमुळे कोकण भागातील पर्यनटाच्या क्षेत्रात वाढ होईल. परिणामी स्थानिकांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील आणि पर्यटकांना कोकण किनारपट्टीचा आनंद घेता येईल. याशिवाय कोकणातील आंबे, काजू आणि सुपारीचे उत्पादन थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाहोचविणं सोपं होईल, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours