27 एप्रिल: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपींग यांच्या शिखर परिषदकडे सर्व जगाचं लक्ष लागलंय. पंतप्रधान मोदी चीनच्या वुहान या शहरात पोहोचले असून 27-28 एप्रिलदरम्यान दोन्ही देशांमध्ये अनौपचारिक शिखर परिषद होणार आहे.
डोकलाम त्यानंतरचा तणाव, सीमावादासह सर्व प्रश्नांवर ही शिखर परिषद होणार आहे. या परिषदेसाठी कुठलाही औपचारिक अजेंडा ठरलेला नाही. मात्र पडद्याआडून दोन्ही देशांचे अधिकारी जोरदार तयारी करच असून बैठकीचा अजेंडा ठरवण्याचं काम सुरू आहे.
चीन आणि अमेरिकेदरम्यान व्यापाराच्या मुद्यांवरून सध्या तणाव आहे. त्यामुळं चीनला भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत त्या पार्श्वभीवर ही भेट महत्वाची आहे. दरम्यान पाकिस्तानची चिंता या भेटीमुळं वाढली आहे. शेवटी चीनने पाकिस्तानने चिंता करू नये असं सांगत शांत करण्याचा प्रयत्न केला.
तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि अध्यक्ष तंग श्योपींग यांची 1988 मध्ये अशीच बैठक झाली होती. त्यानंतर दोन्ही देशांदरम्यानचा तणावही कमी झाला होता. त्या पार्श्वभूमीवरही या भेटीकडे पाहिलं पाहिजे. डोकलाम नंतर संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. चीनसारख्या बलाढ्य शेजाऱ्याशी चांगले संबंध असणं हे भारतासाठी फायद्याचं आहे.
'या' प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता 
- डोकलाम वादानंतर संबंध पूर्ववत करणे
- चीनकडून पाकला वारंवार मिळणारा पाठिंबा
- दक्षिण चिनी समुद्रात चीनची दादागिरी
- भारत, चीन व्यापार चीनच्या बाजूनं झुकलेला
- चीन-पाक इकॉनॉमिक कॉरिडरवर भारताचा आक्षेप
- वन बेल्ट वन रोडबाबत भारत नाराज
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours