27 एप्रिल : नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेनं युतीची वाट न बघताच स्वतःच उमेदवार जाहीर करून टाकले आहेत. शिवसेनेकडून नाशिक विधानपरिषदेसाठी नरेंद्र दराडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय.
कोकणातून राजीव साबळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता भाजपच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय. पुढच्या महिन्यात महाराष्ट्राच्या एकूण ६ विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे.
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठी सेनेनं स्वबळाचा नारा दिलाय. त्यामुळे शिवसेनेच्या विरोधात भाजप उमेदवार देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेत एकूण ६४५ मतं आहेत. त्यापैकी शिवसेनेकडे २११ तर भाजपकडे १८० मतं आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours