भंडाऱ्यात काँग्रेसने कँडल मार्च काढत बलात्काराच्या घटनेचा निषेध केला
भंडारा, १५ एप्रिल २०१८
जम्मू-काश्मीरमधील कठुआ बलात्कार प्रकरण आणि यूपीतील उन्नाव बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरात तसेच महाराष्ट्र राज्यात काँग्रेसच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. तर भंडाऱ्यात जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांच्या नेतृत्वात काँग्रेसने देशामध्ये महिलांवर होणाऱ्या, वाढत्या अत्याचाराचा विरोध करीत केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ कँडल मार्च काढत बलात्काराच्या घटनेचा निषेध केला. यावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. एकेकाळी "महिलाओंके सम्मान में, भाजपा मैदान में", असे म्हणणारे दुतोंडी भाजपाई आता "बलात्कारियोंके बचाओ में, भाजपा मैदान में" याप्रकारे पवित्रा स्वीकारीत आहेत असा उपरोधिक टोला जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी यावेळी हाणला.
भंडाऱ्यात त्रिमूर्ती चौक ते गांधी चौक असा कॅडेल मार्च निघाला. या मोर्चात भंडाऱ्यातील तरुणाईने तसेच जनतेनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. घोषणाबाजी करत दोन्ही घटनांचा निषेध करण्यात आला. कठुआ बलात्कार प्रकरणातील चिमुरडी आसिफाला न्याय मिळावा आणि उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी मोर्चेकरांनी केली. काँग्रेसकडून या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ भंडाऱ्यासह राज्यभरात कँडल मार्च काढण्यात आला. दिल्ली येथील कॅडेल मार्च मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी तर ठाणे येथील मोर्चात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर नेतेही सहभागी झाले होते.
उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरण काय आहे?
भाजपचे उन्नावमधील आमदार कुलदीप सिंह सेंगर आणि त्यांच्या भावाने बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला. खटला मागे न घेतल्यामुळे 3 एप्रिल रोजी आमदाराच्या भावाने पीडितेच्या वडिलांना बेदम मारहाण केली होती. मारहाणीत गंभीर जखमी झालेले वडील सुरेंद्र सिंह यांच्यावरच गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्यांना तुरुंगात पाठवलं. मात्र जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी सुरेंद्र सिंह यांना मृत घोषित केलं. आमदाराच्या भावाने केलेल्या मारहाणीत सुरेंद्र सिंह यांचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला. आमदाराच्या दबावामुळे वर्षभरापासून पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. न्याय न मिळाल्यामुळे रविवारी पीडितेचं कुटुंब उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घरासमोर आत्मदहन करण्यासाठी गेलं. त्यानंतर बलात्कार पीडितेने आत्मदहनाचा प्रयत्न केला. या प्रकरणी भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरला सीबीआयने अटक केली.
जम्मू-काश्मीरमधील कठुआ बलात्कार, हत्या प्रकरण
जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये 8 वर्षीय असिफावर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आठव्या आरोपीविरोधात सोमवारी आरोपपत्र दाखल करण्यात आलं. दरम्यान, या घटनेनंतर आता सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 10 जानेवारीला असिफा खेचर चारण्यासाठी कठुआजवळच्या जंगलात गेली होती. तिथून तिचं एका अल्पवयीन आरोपीने अपहरण केलं आणि जवळच्या मंदिराच्या तळघरात लपवलं. सात ते आठ दिवस नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने अमानुष अत्याचार केले. या नराधमांनी अनन्वित अत्याचारानंतर असिफाची हत्या केली. शोधाशोध करुन थकल्यावर 12 जानेवारीला असिफाच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली. 17 जानेवारीला जंगलात असिफाचा मृतदेह अतिशय भीषण अवस्थेत आढळून आला. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून एसआयटीकडे सोपवण्यात आला. मुख्य आरोपी आणि माजी सरकारी अधिकारी संजी राम हा दोन महिने फरार होता. मार्चमध्ये संजी राम स्वत: पोलिसांसमोर हजर झाला. मेरठमधून त्याचा मुलगा विशालला अटक करण्यात आली. संजी रामला मदत करणं आणि असिफावर अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. दोन महिन्यांनी आरोपपत्र दाखल करण्यास वकिलांनी विरोध केल्याने देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. कॅडेल मोर्च्यात जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, माजी आमदार आनंदराव वंजारी, महीला अध्यक्षा सिमा भुरे, जि.प. सभापती प्रेम वनवे, विकास राऊत, प्रकाश पचारे, अजय तुमसरे, डाॅ. विनोद भोयर, शिशिर वंजारी, प्रशांत देशकर,जि.प. सदस्य प्यारेलाल वाघमारे, अनिक जमा, शहर अध्यक्ष सचिन घनमारे, राजु वंजारी, तालुका अध्यक्ष राजकपुर राऊत, अल्प. संख्या. जिल्हाध्यक्ष आवेश पटेल , नगर सेवक शमिम शेख, मुकुंद साखरकर, विनित देशपांडे, रिजवान काजी, कमलेश बाहे, भावना शेंडे, ज्योती गणवीर, नगर सेवीका जयश्री बोरकर, प्रसन्ना चकोले, भावना रंगारी, ज्योती सुखदेवे, आशा गिर्हेपुंजे, इमरान पटेल, चोलाराम गायधने, सचीन फाले, कमल साठवने, मंगेश हूमने, सुरेश गोन्नाडे, शहजादा भाई, नाहेद परवेज, प्रकाश देशमुख, ईरफान पटेल, शहजाद पटेल,अमय डोंगरे, यश भगत, पराग खोब्रागडे, प्रवीण भोंदे, पराग खोब्रागडे, शमीम पठाण, भारती लिमजे, सुहास गजभिये, अमय डोंगरे, मोहीश कुरैशी, मुशीर पटेल, कमल साठवणे तसेच असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी जिल्हा काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस कमिटी, तालुका काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस, युवक काॅग्रेस, एन. एस. यु. आय. व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post A Comment:
0 comments so far,add yours